Sharad Pawar Narendra Modi Devendra Fadnavis  Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar News : शरद पवारांनी मारले एका दगडात दोन पक्षी, म्हणाले, ''फडणवीसांचा आदर्श घेत मोदींनी...''

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati SambhajiNagar : भाजपची भूमिका समाजविरोधी आणि तेढ निर्माण करणारी आहे. समाजात कटुता कशी वाढेल हीच भाजपची भूमिका आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे. तसेच मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक आहे. मिझोरामसह इतर शेजारच्या राज्यांवर त्याचा परिणाम होत आहे. म्हणूनच आमची मागणी होती की, पंतप्रधानांनी त्याठिकाणी जाऊन तेथील लोकांना आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास द्यावा. पण मोदींना मणिपूरमध्ये जावंसं वाटलं नाही. त्यांना मध्यप्रदेश किंवा इतर ठिकाणी निवडणुकीच्या तयारीच्या सभा घेणे अधिक महत्वाचे वाटले असे टीकास्त्रही पवारांनी यावेळी सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केले. पवार म्हणाले,केंदातील मोदी सरकार(Modi Government) कडून समाजात कटुता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यांना देशात शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण आता भाजपकडून जाती- जातीत तेढ निर्माण केली जात आहे असेही पवार यावेळी म्हणाले.

अधिवेशनाच्या चर्चा सत्रात तरी ते देखील बोलतील असे वाटले होते. पण भाषणाच्या अगदी शेवटी आठ मिनिटे फक्त ते मणिपूरवर बोलले. मणिपूरमध्ये आज घराला आगी लावल्या जात आहेत, हिंसाचार होत आहे. तसेच महिलांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांचे अब्रूचे धिंडवले काढले जात आहेत. पण केंद्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे असेही पवार म्हणाले.

मणिपूरसह देशातील विविध समस्यांवर ते १५ ऑगस्टच्या भाषणांमधून तरी ते या मुद्द्यांवर बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी फडणवीसांचा आदर्श घेतल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील पुन्हा पुन्हा येईल असे म्हणाले होते. ते आले पण त्यावर पदावर आले नाही. त्या खालच्या पदावर आले. आता मोदींनी देखील आपल्या भाषणात पुन्हा येईनचा म्हणाले आहेत. पण ते कोणत्या पदावर येतात हे मला माहित नाही असा टोला लगावत शरद पवारांनी एकाच दगडाच दोन पक्षी मारले.

शरद पवारां(Sharad Pawar) ना कृषी मंत्रिपद आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि इतर काही ऑफर अजित पवारांद्वारे देण्यात आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर शरद पवार म्हणाले, कोणी काय विधान केलं ते मला माहित नाही. आमच्या गुप्त बैठकीत अशी कोणतीही चर्चा झाली नाही. भेट झाली होती. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझा सल्ला घेण्याची पद्धत आमच्या परिवारात आहे. त्यातून गैरसमज करून घेण्याचं कारण नाही, असंही पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT