Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar : मनोज जरागेंचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात शरद पवारांची खास रणनीती

Sudesh Mitkar

Political News : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा हा मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू बनला आहे. लोकसभा निवडणुकीत देखील मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनाचा प्रभाव या भागावर असल्याचं पाहायला मिळालं. या प्रभावामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मराठवाड्यात जोरदार फटका बसला तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यामुळे एकीकडे भाजपकडून या भागामध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या भागातील उमेदवार निवडण्यासाठी स्वतः लक्ष घातल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामधून आंदोलनाला सुरुवात केली. आंतरवली सराटीत त्यांनी उपोषण सुरू असताना उपोषणस्थळी लाठीमार झाला आणि हे आंदोलन राज्यभर पसरले. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. जरांगे यांच्या आंदोलन इफेक्टमुळे बीड मधून पंकजा मुंडे तर जालन्यामधून रावसाहेब दानवे यासारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठे यश मिळाले.

जालन्यामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे (Kalyan Kale), काँग्रेस शिवाजीराव काळगे (लातूर), नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण, हिंगोली ठाकरे गटाचे नागेश पाटील, धाराशिव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, परभणी ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी विजय साकार केला. मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महाविकास आघाडीला निवडत महायुतीला नाकारल्याचं चित्र पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच यश संपादन करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतण्यात येत आहेत. खुद्द शरद पवारच (Sharad Pawar) या मुलाखतीत घेत असल्यामुळे नेमक्या कोणत्या उमेदवारांना या भागातून संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान पुण्यामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे घेता येते याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये जो इच्छूक आहे त्याच्याशी शरद पवार स्वतः चर्चा करणार आहेत. शरद पवारांची कार्यपद्धती पाहिजे तर त्यांच्यासाठी कोणी छोटा अथवा मोठा नसतो त्यांच्या प्रेमाचा असतो. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे त्या प्रत्येकाशी शरद पवार स्वतः भेटणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. ऐकून घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

आज बजरंग सोनावणे (Bajarang Sonawane) यांच्या मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती आहेत ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणच्या खासदाराचे मत विचारात घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे. मात्र ज्यांनी ज्यांनी इच्छुक म्हणून फॉर्म भरला आहे त्या प्रत्येकाचा मानसन्मान होणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT