NCP EX Mayor Deepak Deshmukh Join NCP SP News Parli Sarkarnama
मराठवाडा

NCP (SP) News : धनंजय मुंडेंच्या कामाचा कच्चाचिठ्ठा खोलत बडा नेता शरद पवारांकडे; बजरंगबाप्पांनी परळीत भावा-बहिणीच गणित बिघडवलं...

Parli Nagar parishad Election 2026 : शरद पवारांसोबत गेल्यानंतर देशमुख यांच्या पत्नीची उमेदवारी कायम राहणार आहे. परळीत घडलेल्या या घडामोडीमुळे धनंजय मुंडे आता अधिक सतर्क झाले आहेत.

Jagdish Pansare

  1. परळीत शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात मोठी चाल खेळत माजी नगराध्यक्ष दिपक देशमुखांना पुढे केले.

  2. दिपक देशमुखांनी तुतारी हाती घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली आहे.

  3. या घडामोडींमुळे परळीतील आगामी निवडणुकीत मुंडेंसमोर कठीण आव्हान निर्माण होण्याची शक्यता.

Parli News : धनंजय मुंडे हे बंगल्यावर बसून कारभार हाकतात. परळीतील एकही विकास काम त्यांनी पूर्ण केलेले नाही. हजारो कोटी परळी तीर्थक्षेत्र व मतदारसंघासाठी आले. पण त्याचा योग्य विनियोग झाला नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे याबाबत अनेकदा तक्रारी केल्या, पण त्यांनीही दुर्लक्ष केले. मी पक्षनिष्ठ नाही, तर व्यक्तीनिष्ठ आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे परळीचे माजी नगराध्यक्ष दिपक पवार यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्या कारभारावर आक्षेप घेत दिपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश केला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वात मुंबईत आज देशमुख यांनी आपल्या समर्थकांसह हाती तुतारी घेतली. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर आमदार धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान, परळीचे नगराध्यक्षपद सर्व साधारण महिलासाठी राखीव झाले आहे. दीपक देशमुख यांनी त्यांच्या पत्नी संध्या यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला होता.

शरद पवारांसोबत गेल्यानंतर देशमुख यांच्या पत्नीची उमेदवारी कायम राहणार आहे. परळीत घडलेल्या या घडामोडीमुळे धनंजय मुंडे आता अधिक सतर्क झाले आहेत. दीपक देशमुख यांनी परळी नगरपरिषदेत विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आमदार, सत्ताधाऱ्यांचे काम मी पाहिले आहे. अर्धवट असलेल्या या कामांबद्दल वरिष्ठांच्या कानावर वारंवार सगळ्या गोष्टी घातल्या. पण त्यातून कुठलाच मार्ग निघाला नाही.

या आधी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वादामध्ये माझे तिकीट कापले गेले होते. त्यानंतर मी अपक्ष उभा राहिलो. यात कोणीही श्रेय घ्यायचे काम नाही. मी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे तर विधानसभेला धनंजय मुंडे यांचे काम केले. परळीतील बोगस मतदानाबाबत आपण धनंजय मुंडे साहेबांना सांगितले होते की, आपण निवडून येऊ. पण, हे प्रकार थांबवले पाहिजेत. पण त्यावर त्यांनी काहीही केले नाही.

परळीतील जनता माझ्या पाठीशी आहे. नगराध्यक्षपदासाठी मी पत्नी संध्या यांच्यासाठी दीड महिन्यापासून प्रचार करत आहे. परळीत सगळे आम्हाला अर्धवटराव म्हणतात. कारण नगराध्यक्ष म्हणून आम्हाला धनंजय मुंडे यांनी काम करू दिलं नाही. आता कामे पूर्ण करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलोय. अर्धवट कामे आता पूर्ण करायची आहेत. आतापर्यंत जेवढी करोडो रुपयांची टेंडर काढली त्या सगळ्या फाईल नगरपरिषदेतून गायब आहेत.

हजारो कोटीची कामे त्यामुळेच अर्धवट आहेत. धनंजय मुंडे हे बोगस मतदानावर निवडून आले आहेत. त्यांना विधानसभेला जेवढी मत मिळाली ती आता मिळतायत का बघा? आम्ही बोगस मतदान होऊ देणार नाही. मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रातील सगळे सीसीटीव्ही काढून टाकले होते आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी जाऊन बोगस मतदान केलं आहे, असा आरोप दीपक देशमुख यांनी केला आहे.

FAQs

1. परळीत शरद पवारांनी कोणती नवी चाल खेळली?
→ शरद पवारांनी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुखांना परळीतील नेतृत्वाची जबाबदारी देत धनंजय मुंडेंना धक्का दिला आहे.

2. दिपक देशमुख कोण आहेत?
→ दिपक देशमुख हे परळीचे माजी नगराध्यक्ष असून स्थानिक राजकारणात प्रभावशाली नेते आहेत.

3. या घडामोडींचा धनंजय मुंडेंवर काय परिणाम होईल?
→ त्यांच्या परळीतील राजकीय पकडीवर परिणाम होऊ शकतो आणि आगामी निवडणुकीत आव्हान निर्माण होईल.

4. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा काय फायदा आहे?
→ स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन नेतृत्व उभं राहू शकतं.

5. परळीतील निवडणुकीवर याचा कसा परिणाम दिसेल?
→ परळीतील समीकरणे बदलण्याची शक्यता असून, शरद पवार आणि मुंडे यांच्यात थेट सामना होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT