
Beed political allegations : बीडमधील राजकीय गुन्हेगारीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरले आहे. या गुन्हेगारीचे आजही धक्के बसतात. हे थोडं असतानाच, आता जादूटोण्यामुळे बीड चर्चेत आले आहे.
विशेष म्हणजे, हा जादूटोण्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघात झाला आहे. या प्रकारामागे दुसरे-तिसरे कोणी नसून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
परळी (Parli) शहरात सप्तश्रृंगी देवी मूर्तीस्थापनेची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान अंधश्रद्धेचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते बालाजी ढगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी हा जादूटोण्याचा प्रकार केल्याचं समोर येत आहे. मिरवणुकीच्या दरम्यान, रस्त्याच्या मधोमध कोंबड्याचा बळी देत नागलीची पाने, हळद, कुंकू आणि लिंबू टाकून हे अघोरी कृत्य केल्याचा आरोप केला आहे.
ही कृती सार्वजनिक ठिकाणी करून परिसरात अंधश्रद्धा पसरवण्यात आल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी केला आहे. परळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
माजी नगराध्यक्ष दीप देशमुख हे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दीपक देशमुख हे सप्तशृंगी दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने 4 जुलैला परळी शहरात सप्तशृंगी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. या निमित्ताने शहरात मिरवणूक काढण्यात आली होती.
मिरवणुकीत गोंधळी पथक, तृतीयपंथीय कलाकार, संबळ वाजवणारे आराधी, तसेच सजवलेल्या घोड्यांसह रथामध्ये सप्तश्रृंगी देवीची मूर्ती नेण्यात आली. ही मिरवणूक दीपक देशमुख यांच्या गणेश पार इथल्या निवासस्थानापासून सुरवात झाली होती.
या मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक रस्त्यावर हळदी-कुंकूने चौकोन आखून त्यात नारळ, नागवेलीची पाने आणि इतर पूजावस्तू टाकण्यात आल्या. त्याच ठिकाणी कोंबड्याचा बळी दिला. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. यावरून आता स्थानिक राजकारण तापलं असून, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.