Beed Politics News : परळीतील शासन आपल्या कार्यक्रमात कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दणक्यात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवसी आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही व्यावसपीठावर उपस्थित होत्या.
जीवनात अनेक सभा केल्या. अनेक कार्यक्रम केले. पण शासन आपल्या दारी या निमित्ताने पहिल्यांदा असा कार्यक्रम होतोय की व्यासपीठावर एवढी मोठी संख्या पाहून कुठल्याही वक्तव्याला बोलावेसे वाटेल. माझ्या जीवनात हा पहिलाच प्रसंग आहे, की एवढ्या सगळ्या उपस्थितांना पाहिल्यावर आणि व्यासपीठावरील उपस्थित मंडळींना बघितल्यावर तोंडातून शब्दही निघत नाहीये. आणि एका वाक्यात आपलं भाषण संपवावे, की माझीच नजर ना लागो, माझ्या या वैभवाला, असे धनंजय मुंडे म्हणाले.
मुख्यमंत्री स्वतः दारात आलेत. बीड जिल्ह्यातील 36 हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला. बीड जिल्ह्याच्या इतिहासात एवढा निधी कधीही आला नाही, इतका निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे आला. बीड जिल्ह्यातील 1400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. बीड जिल्ह्याला 1400 कोटी रुपये दिले त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो, असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
बीड जिल्ह्याचा एक नागरीक म्हणून, या भागाचा आमदार म्हणून, कृषी विभागाची आणि पालकमंत्री म्हणून दिलेल्या जबाबदारीतून एक विश्वास देतो आज ज्या पद्धतीने ताकदीने बीड जिल्ह्याच्या मागे उभे आहात, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी गंगा या ठिकाणी देताय. थोडेसे आणखी हात ढिले करा. हा बीड जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही. हा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही. तर हा बीड सर्वांत विकसित आणि सगळ्यात चांगले काम केलेला जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असे मंत्री मुंडे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण काय आहे? असे अनेकजण म्हणाले. तर ते आकर्षण काय आहे हे आमच्या पंकजाताईने सांगितले. व्यासपीठावर ताई आणि मी एकत्र आहे. अजितदादा आणि देवेंद्रभाऊ एकत्र आहेत. बाळाकाका आणि सुरेश आण्णा एकत्र आहेत. भय्यासाहेब आणि लक्ष्मण आण्णा एकत्र आहेत. असे सगळे पाहिल्यावर तुम्ही खरेच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळे एकी निर्माण होतेय, असे धनंजय मुंडे म्हणाले.
अजितदादा आणि देवेंद्रभाऊ तुम्ही विलक्षण प्रेम केलं. पंकजाताईने विकासाची सुरुवात केली. आता विकासाच्या मध्यावर बीड जिल्हा कुठेतरी आहे. आता तुम्हा सर्वांच्या साक्षीने आणि बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या साक्षीने शब्द देतो आम्ही दोघे (पंकजाताई ) मिळून. इथे जे एकत्र आलेत ते सगळे मिळून या बीड जिल्ह्याच्या विकास करून दाखवू. या पलिकडे दुसरं कुठलं वचन देऊ शकत नाही, असे आश्वासन मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.