Shivsena Political News  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Political News : माझा जीव घ्या; पण मतदारसंघावर सूड उगवू नका, ठाकरेंचे आमदार संतापले...

Jagdish Pansare

Marathwada Political News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापूर्वी झालेल्या बंडात जे शिवसेनेचे आमदार सहभागी झाले नाहीत, त्यांच्यावर सरकार सूड उगवत आहे, असा आरोप केला जातो. (Kannad Constituency News) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड-सोयगावचे आमदार उदयसिंह राजपूत यांनीही असा आरोप केला आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीकविम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळण्याच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानभरपाई पोटी २५ टक्के पीकविमा अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. (Udayasinh Rajput) राजपूत आमदार असलेल्या कन्नड मतदारसंघाला यातून वगळण्यात आल्याने ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. (Shivsena) कन्नड तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करताना आमदार राजपूत चांगलेच संतापले होते.

मी सुरत, गुवाहाटीला सोबत आलो नाही, उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलो म्हणून सरकार माझ्यावर सूड उगवत आहे. (Kannad) पाहिजे तर मला फासावर लटकवा, माझा जीव घ्या;पण माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांवर असा सूड उगवू नका, असे आवाहन यावेळी राजपूत यांनी केले. जिल्ह्यातील ८९ महसुली मंडळांपैकी बहुतांश भागात शेतकऱ्यांना २५ टक्के पीकविमा अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फक्त कन्नड-सोयगाव तालुका यातून वगळण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून सत्ताधाऱ्यांकडून माझ्या मतदारसंघावर सातत्याने अन्याय होत आहे. निधी दिला जात नाही, कामांना मंजुरी मिळत नाही, हे सगळं का? तर मी गद्दारी केली नाही, त्यांच्यासोबत सुरत, गुवाहाटीला गेलो नाही. पण याची शिक्षा माझ्या मतदारसंघातील लोकांना, शेतकऱ्यांना का दिली जात आहे? मला फाशी द्या, पण शेतकऱ्यांवर अन्याय करू नका. पिकांच्या नुकसानीसाठीची २५ टक्के अग्रिम रक्कम तत्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात आठवडाभरात जमा करा, अन्यथा रस्त्यावर उतरून हजारोंच्या संख्येने चा मोर्चा काढत सरकारला जाब विचारू, असा इशाराही उदयसिंह राजपूत यांनी दिला.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठीकतही राजपूत यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांना मंजुरी आणि निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत कागदपत्र भिरकावत संताप व्यक्त केला होता. शिंदेच्या बंडात मी सहभागी झालो नाही, म्हणून माझ्यावर हा अन्याय केला जात असल्याचा आरोपही तेव्हा राजपूत यांनी केला होता. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत याचा फटका ठाकरे गटाला बसू शकतो. त्यामुळे वेळीच सरकारविरोधात आवाज उठवत मतदारसंघातील विकासकामे आणि योजनांना मंजुरी मिळवून घेण्याचा राजपूत यांचा प्रयत्न आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT