Eknath shinde & devendra Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

Shivsena broken Mahayuti : युती तुटल्यात जमा? शिरसाटांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, 'कावेबाजपणा...'

Sanjay Shirsat On Chhatrapati Sambhajinagar elections : छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला धक्का बसला असून येथे युती होण्याच्या सर्व आशा मावळल्या आहेत. याबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांनीच संकेत दिले आहेत.

Jagdish Pansare

  1. भाजपकडून अद्याप युतीचा अंतिम प्रस्ताव न आल्याने शिंदे गट नाराज आहे.

  2. संजय शिरसाट यांनी भाजप उमेदवारी अर्ज रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

  3. युती होणे कठीण असल्याचे संकेत देत महायुतीत मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : भाजपकडून आतापर्यंत युतीसाठीचा प्रस्ताव देण्यात आलेला नाही. भाजप आम्हाला झुलवत ठेवत आहे. आमचे उमेदवारी अर्ज दाखलच होऊ नयेत, असा त्यांचा प्रयत्न दिसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानूसार आम्ही लहान भावाची भूमिका स्वीकारत 40-43 चा अंतिम प्रस्ताव दिला होता. पण त्यावर भाजपच्या नेत्यांनी अजून आम्हाला निरोप दिलेला नाही, असा आरोप करत आता युती होणे शक्य नसल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

जागा वाटपात आपल्या समर्थकांची उमेदवारी धोक्यात आल्यानंतर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणुकीतून माघारीची घोषणा केली. महिला महानगरप्रमुख शारदा घुले यांनी पक्षातील नेत्यांवर तिकीटे विकल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली.

त्यानंतर राजेंद्र जंजाळ हे आपल्या शेकडो समर्थकांसह पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर धडकले. तिथे आधी शिवसेनेचे पक्ष निरीक्षक पारकर यांनी जंजाळ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही वेळाने संजय शिरसाट बंगल्याच्या बाहेर आले आणि ते नाराज जंजाळ आणि त्यांच्या समर्थकांना सामोरे गेले.

भाजपचा आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, तो यशस्वी होऊ देऊ नका. मी तुमचाच आहे, राजेंद्र जंजाळ किंवा तुमच्या प्रभागांमध्ये कुठेही अन्याय होऊ देणार नाही, पालकमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. तब्बल अर्था ते पाऊण तास त्यांनी भाजपसोबत युतीसाठी झालेल्या दहा बैठकांमधील घटनाक्रमच जाहीर केला. भाजपला युती करण्याची इच्छा नसल्यामुळेच ते आपल्याला झुलवत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही चर्चा केली.

भाजप स्वतःला मोठा भाऊ म्हणत आहे, आम्ही ते ही मान्य केले. जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आणि एक खासदार असूनही आम्ही दोन पाऊलं मागे येण्याची भूमिका स्वीकारली. ज्याचा जिथे आमदार तिथे त्याला साठ टक्के आणि उर्वरित चाळीस टक्के असा प्रस्ताव आपण दिला.

गेल्यावेळी ज्या पक्षाने जितक्या जागा जिंकल्या त्या त्यांच्याकडे आणि बाकीच्या जागा अर्ध्या अर्ध्या हा दुसरा प्रस्ताव दिला. पण त्यावरही एकमत झाले नाही. शेवटी वेळ निघून जात आहे, उमेदवाराना अर्ज भरायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आज आम्ही 40 जागा शिवसेना आणि 43 जागा भाजपने लढवाव्यात असा प्रस्ताव दिला.

पण भाजपचे नेते नुसत्या बैठकांना येतात आणि परत येतो सांगून जातात, वाट बघायला लावतात. फडणवीस-शिंदेसाहेबांनी युती करा, असे स्पष्ट आदेश दिल्यामुळे आम्ही शेवटपर्यंत वाट बघतोय. पण भाजप नेत्यांची युती करण्याची इच्छा नाही हेच त्यांच्या एकूण वागणूकीवरून दिसून आले आहे. राजेंद्र जंजाळ यांचा ज्या प्रभागातील जागा आपण सोडतोयं त्यावर आक्षेप आहे. पण याचा निर्णय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्यामध्ये वाद होता कामा नये. आता लवकर निर्णय घेण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे.

अर्ध्या तासाने आम्ही पुन्हा एकनाथ शिंदे यांना फोन करणार आहोत. सगळी परिस्थिती, भाजपकडून सुरू असलेला कावेबाजपणा हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणू देणार आहोत. काही उमेदवारांना आज आम्ही अर्ज दाखल करायला सांगितले होते. आता भाजपची वाट पहाणे शक्य नाही. उद्या सकाळपर्यंत त्यांच्या प्रस्ताव आला नाही तर मग युतीचा विचार न करता आम्हाला पुढे जावे लागेल, असा शेवटचा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.

FAQs :

Q1. संजय शिरसाट यांनी नेमका काय आरोप केला आहे?
➡️ भाजप जाणीवपूर्वक युतीचा निर्णय लांबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Q2. शिंदे गटाने भाजपला किती जागांचा प्रस्ताव दिला होता?
➡️ 40 ते 43 जागांचा अंतिम प्रस्ताव दिल्याचे शिरसाट म्हणाले.

Q3. भाजपकडून या प्रस्तावावर उत्तर आले आहे का?
➡️ नाही, अजून कोणताही अधिकृत निरोप आलेला नाही.

Q4. यामुळे महायुती तुटू शकते का?
➡️ शिरसाटांच्या वक्तव्यानुसार युती होणे कठीण असल्याचे संकेत मिळत आहेत.

Q5. याचा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
➡️ युती न झाल्यास महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या जाऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT