Sanjay Shirsat As A spokesperson News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat As A Spokesperson: ठाकरे गटावर तुटून पडणारे शिरसाट आता शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते..

Shivsena : सुरत, गुवाहाटीतून थेट जाहीर पत्र लिहित उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवणारे संजय शिरसाट हे पहिले आमदार होते.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडापासून ते राज्यातील सत्तांतरानंतर सातत्याने उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह संपुर्ण ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या विरोधात आमदार संजय शिरसाट हे आक्रमक भूमिका मांडत आहेत. त्यांच्या या भूमिकेला आता अधिकच धार येणार आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांची आता शिवसेनेच्या प्रवक्ते पदी अधिकृत निवड केली आहे.

नुकतेच या संदर्भातील पत्र शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते (Shivsena) शिवसेनेच्या तिकीटावर सलग तिसऱ्यांदा विधान सभेवर निवडून गेले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना मंत्रीमंडळात संधी मिळेल अशी अपेक्षा होती.

परंतु त्यांच्याऐवजी संदीपान भुमरे व नव्यानेच शिवसेनेत आलेल्या अब्दुल सत्तारांना मंत्री करण्यात आले होते. तेव्हापासूनच ते नाराज होते, दरम्यान, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी त्यांनी जवळीक वाढली. आघाडी सरकार असतांना नगरविकास खात्याकडून शिरसाट यांच्या मतदारसंघासाठी शिंदेनी भरघोस निधी दिला होता. त्यामुळे जेव्हा शिंदेंनी बंडांचा झेंडा फडकवला तेव्हा त्याला भक्कम साथ शिरसाट यांनी दिली होती.

एवढेच नाही तर सुरत, गुवाहाटीतून थेट जाहीर पत्र लिहित उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवणारे संजय शिरसाट हे पहिले आमदार होते. तेव्हापासून घेतलेली आक्रमक भूमिका राज्यातील सत्तांतर होवून अद्याही मंत्रीपद मिळाले नसले तरी त्यांनी कायम ठेवली आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यासह जिल्ह्यातील ठाकरे गटाचे स्थानिक नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यावर शिरसाट सातत्याने हल्ला चढवत शिंदे गटाचा किल्ला नेटाने लढवतांना दिसतात.

याचीच दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिरसाट यांना अधिक बळ देण्याचे ठरवत त्यांची शिवसेनेच्या प्रवक्ते पदी निवड केली आहे. राज्यमंत्री मंडळात संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिरसाटांना प्रवक्ते पद देत तुर्तास त्यांची नाराजी काही प्रमाणात कमी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT