Nanded Market Committee : आघाडीकडून लढण्यासाठी इच्छूकांची गर्दी, तर भाजप-शिंदे युतीचा नाराजांवर डोळा..

Congress : आघाडीच्या पॅनेलचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे राहणार असल्याने उमेदवारी निवडीत त्यांचा शब्द अंतिम राहणार.
Nanded Market Committee News
Nanded Market Committee NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nanded Market Committee) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. बोलावणे आल्याशिवाय माघारी नाही अशा भूमिकेत उमेदवार असल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांची कसोटी लागणार आहे. काँग्रेस प्रणित पॅनेलमध्ये समावेश होण्यासाठी उत्सुकांची गर्दी जास्त असल्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Nanded Market Committee News
Chhatrapati Sambhajinagar Market Committee : काळेंचा अर्ज वैध ठरला, माजी सभापती पठाडेंना आणखी एक धक्का..

तर भाजप-सेना मजबूत पॅनेल करण्यासाठी प्रयत्न करीत असून (Mahavikas Aghadi) आघाडीतील नाराज उमेदवारांना आपल्या गळाला लावण्यासाठी प्रयत्न करतांना दिसते. (Bjp) दरम्यान अर्धापूर तालुक्यातील एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

बाजार समितीच्या १८ जागांसाठी २४२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. त्यापैकी ग्रामपंचायत गटातून काँग्रेचे परमेश्वर रोहीदास बंडाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. (Ashok Chavan) त्यांच्या आईचा सेवा सहकारी सोसायटी गटात महिला सर्वसाधारण राखीव जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना येत्या दोन दिवसांत वेग येणार असून उमेदवारांची पळवापळवी, नाराजी, बंडखोरी आदी घडामोडी होण्याची शक्यता आहे. आघाडीच्या पॅनेलचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे राहणार असल्याने उमेदवारी निवडीत त्यांचा शब्द अंतिम राहणार. तर भाजप, सेना युतीच्या पॅनेलचे नेतृत्व खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, धर्मराज देशमुख यांच्याकडे आहे.

तोडीस तोड उमेदवार देण्याची त्यांची तयारी सुरू आहे. अर्धापूर तालुक्यात काँग्रेस प्रणित पॅनेलच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या हेवी वेट उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर भाजप, सेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्धापूर तालुक्यात दोन्ही पॅनेलमध्ये मातब्बर नेत्यांचा समावेश राहणार आहे. पॅनेलचे अंतिम चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता.२०) स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com