Sanjay Shirsat| CM Eknath Shinde |  
मराठवाडा

Aurangabad Politics : शिरसाटांना 'या' मंत्रीपदाची अपेक्षा: एकनाथ शिंदे पुर्ण करणार का?

Sanjay Shirsat| CM Eknath Shinde | राजकारणात सर्वांना पुढे जायचं असतं, सर्वांना वाटंत तसं मलाही वाटणं स्वाभाविकच आहे ना.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आमच्या उठावाच्या काळात जे आपली मंत्रीपदे सोडून आमच्या सोबत आले, त्यांना मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा होती. राजकारणात सर्वांना पुढे जायचं असतं, सर्वांना वाटंत तसं मलाही वाटणं स्वाभाविकच आहे ना. माझीही मंत्री होण्याची माझीही इच्छा आहे. पण कोणतीही राजकीय भूमिका घेताना कशाला प्राधान्य द्यावं, हे वरिष्ठ ठरवत असतात. त्याप्रमाणे पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, असे स्पष्टीकरण औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिले. औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Aurangabad Political news)

यावेळी बोलताना संजय शिरसाट यांना तुम्हाला कोणतं मंत्रीपद हवे आहे असे विचारण्यात आला. यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, मी कॅबिनेट मंत्रीपद आणि औरंगाबादचे पालकमंत्रीपदाची मागणी केली आहे, आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील. मंत्रीपद द्यायचं तर देतील नाहीतर त्यांची मर्जी.'' तसेच, आज खातेवाटप होण्याची दाट शक्यता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरसाट यांची ही इच्छा पुर्ण करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मंत्रीमंडळाच्या विस्तारात आदल्या दिवशी रात्रीपर्यंत तुमच्या नावाची चर्चा होती, पण ऐन वेळी नाव कापलं, असं विचारलं असता शिरसाट म्हणाले, ''आमच्या गटात ४० आणि अपक्ष १० असे आमदार आहेत. या प्रत्येकाला मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी अपेक्षा आहे. पण राजकीय भूमिका घेताला कशाला प्राधान्य द्याव हे वरिष्ठ ठरवत असतात. पण मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी शिंदेवर कोणतेही दबावतंत्र वापरणार नाही, आमच्यात कोणतेही वाद नाहीत.'

पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी प्रत्येकाला कॉल केले जात होते. त्याप्रमाणे मलाही कॉल आला. मला कॉल आला म्हणजे मी मंत्री होणार असं मी समजलो. याबाबत मी कोणाला सांगणार मी घरच्यांना सांगितलं आणि ती बातमी लीक झाली. आपला माणूस मंत्री होणार या आनंदाने कार्यकर्तेही मुंबईला धावले. पण कधी कधी कॉम्प्रमाईज करावं लागतं, आणि मी ते केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT