हो, मी नाराज होतो; अखेर संजय शिरसाटांनी स्पष्टचं सांगितलं...

Sanjay Shirsat| उद्धव ठाकरेंचा उल्लेख असलेल्या त्या ट्विटबाबत संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे.
Sanjay Shirsat|
Sanjay Shirsat|
Published on
Updated on

औरंगाबाद : ''मी दबावतंत्र कधी वापरलं नाही, कधी तसं कधी करणारही नाही. कालचं ट्विट टेक्निकल प्रॉब्लेममुळे पोस्ट झालं. ते ट्विट मार्च महिन्यातलं होतं आणि चुकून पोस्ट झालं. माझ्या लक्षात आलं म्हणून ते लगेच डिलीट केलं. असा खुलासा करत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काल केलेल्या ट्विटचा खुलासा केला आहे. (Aurangabad Political news)

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यातच काल शिरसाट यांच्याकडून एक ट्विट पोस्ट झालं. या ट्विटमध्ये त्यांनी 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतचं त्यांनी विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषणही जोडलं होतं. पण काही मिनिटांतच त्यांनी हे ट्वीट डिलीटही केलं. त्यामुळे शिरसाट दबावतंत्र वापरत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या.

Sanjay Shirsat|
संजय शिरसाटांच्या मनात नक्की चाललंय तरी काय? ट्विट करत उद्धव ठाकरेंचा कुटूंबप्रमुख म्हणून उल्लेख

अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत या ट्विटबाबत खुलासा केला आहे. '' मंत्रीपद न मिळाल्याने मी नाराज होतो, पण पुढच्या विस्तारात मंत्रीपद देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे. पण मी शिंदेंसोबतच राहणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या काळात अनेक घटना घडल्या, आम्हालाही नंदनवन ला बोलवलं होत. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. असं शिरसाट यांनी सांगितलं.

तसेच, आमच्या उठावाच्या काळात जे आपली मंत्रीपदे सोडून आमच्या सोबत आले, त्यांना मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा होती. राजकारणात सर्वांना पुढे जायचं असतं, तसं मलाही जायंच आहे. सर्वांना वाटंत तसं मलाही वाटण स्वाभाविकच आहे ना. माझीही मंत्री होण्याची माझीही इच्छा आहे. कोणतीही राजकीय भूमिका घेताला कशाला प्राधान्य द्याव हे वरिष्ठ ठरवत असतात. त्याप्रमाणे पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. असंही शिरसाट यांनी सांगितलं.

मंत्रीमंडळाच्या विस्तारात आदल्या दिवशी रात्रीपर्यंत तुमच्या नावाची चर्चा होती, पण ऐन वेळी नाव कापलं, असं विचारलं असता शिरसाट म्हणाले, ''आमच्या गटात ४० आणि अपक्ष १० असे आमदार आहेत. या प्रत्येकाला मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी अपेक्षा आहे. पण राजकीय भूमिका घेताला कशाला प्राधान्य द्याव हे वरिष्ठ ठरवत असतात. पण मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी शिंदेवर कोणतेही दबावतंत्र वापरणार नाही, आमच्यात कोणतेही वाद नाहीत.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com