Ashok Chavan With Subhas Sabane Sarkarnama
मराठवाडा

मुखडे विधानसभा निवडणूक : साबणेंच्या बंडखोरीचा काॅंग्रेसला धसका...

(Deglur-Biloli By Election)मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले (Ex.Mla Subhash Sabane) शिवसेनेचे सुभाष साबणे बंडखोरीच्या तयारीत असल्याची देखील जोरदार चर्चा आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाल्यापासून नांदेड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. काॅंग्रेसकडून दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलालाच उमेदवारी दिला जाणार अशी जोरदार चर्चा आहे. पण यामुळे काॅंग्रेसमधील इतर इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरते की काय? अशी परिस्थिती आहे.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे आणि ही जागा काॅंग्रेसची असल्याने या मतदारसंघात काॅंग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. परंतु या मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे सुभाष साबणे बंडखोरीच्या तयारीत असल्याची देखील जोरदार चर्चा आहे.

भाजप त्यांना आपल्या गळाला लावण्याच्या तयारीत असून साबणे भाजपचे उमेदवार असू शकतील असे देखील बोलले जाते. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या टिळक भवनात काॅंग्रेस प्रदेश कमिटीची बैठक झाल्यानंतर नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र साबणे यांच्या बंडखोरीची चर्चा फोल असल्याचे म्हटले आहे.

साबणे हे एक जबाबदार शिवसैनिक आहेत, ते असे काही करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी उमेदवारीच्या विषयावर भाष्य केले. काॅंग्रेसकडून ६ इच्छूकांनी अर्ज केले आहेत. यावरअखिल भारतीय काॅंग्रेस कमिटी अंतिम निर्णय घेणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नांदेड येथील पूर परिस्थीतीवर बोलतांना चव्हाण म्हणाले, पूरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नूकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने पीकं विमा मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पालकमंत्री म्हणून आपण आज आणि उद्या जिल्ह्याचा दौरा करून झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहोत.

राज्यात विशेषतः मराठवाड्यात अतिवृ्ष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी होत आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात मंत्रीमंडळात चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पंजाब मधील राजकीय घडामोडी, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काॅंग्रेसचा दिलेला राजीनामा यावर, काॅंग्रेसची सत्ता असलेल्या अनेक राज्यात समस्या आहेत, मात्र त्या चर्चेने सोडविल्या गेल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT