Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील अर्ध्या लोकांचा महायुतीला विरोध, 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

Ambadas Danve On Ajit Pawar Group : अजितदादांच्या गटामुळे महायुती आणि प्रामुख्याने भाजपच्या मतदानावर परिणाम झाल्याची ओरड युतीतील काही नेत्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे महायुतीचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झाल्याचंही बोललं जात आहे.

Jagdish Patil

Chhatrapati Sambhajinagar News, 23 June : अजित पवार (Ajit Pawar) गटामुळे महायुती आणि प्रामुख्याने भाजपच्या मतदानावर परिणाम झाल्याची ओरड युतीतील काही नेत्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे महायुतीचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झाल्याचंही बोललं जात आहे. यामध्ये शिंदे गटाचे रामदास कदम यांनी देखील पवार गटामुळे कमी जागा मिळाल्याचं म्हटलं होतं.

अर्थात हा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून फेटाळण्यात आला. मात्र, वारंवार होणाऱ्या टीकेमुळे अजित पवार गटात अस्वस्थता असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता ठाकरे गटाच्या एक बड्या नेत्याच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी महायुतीच्या जागा वाटपावर बोलताना मोठा दावा केला आहे. अजित पवार गटातील अर्ध्या लोकांनी महायुती करायला विरोध केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार गटाची एक बैठक झाली, त्या बैठकीत अजित पवार गटातील अर्ध्या लोकांनी महायुती करायला विरोध केला आहे. त्यामुळे युतीचं जागा वाटप झालं हे खोटं आहे. अजून कोणत्याच पक्षाचे जागावाटप झालेलं नाही."

दरम्यान, निवडणूक आयोगाने जो अहवाल मागवला आहे. तो त्याच वेळी मागवला असता तर चांगलं झालं असतं. पण तरीही काही हरकत नाही. येणाऱ्या विधानसभेत असे काही होऊ नये याची काळजी आयोगाने घ्यावी, असं दानवे म्हणाले. तसंच यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि मुस्लिम आरक्षणावरही भाष्य केलं.

मराठा दुश्मन आहेत का?

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे मराठा दुश्मन आहेत का? हे त्यांनी स्पष्ट करावं असं दानवे म्हणाले. भुजबळांच्या वक्तव्यचा आधार घेत त्यांनी हा निशाणा साधला. दानवे म्हणाले, "दुश्मन कोण आहे हे छगन भुजबळांनी मराठा त्यांचे दुश्मन आहेत का…? हे स्पष्ट केलं असतं. तर बरं झालं असतं. तर 'दिलबर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम' तर तुमचे दुश्मन कोण आहे ही भूमिका स्पष्ट करा."

आरक्षण जातीला धर्माला नव्हे

तर मुस्लिम आरक्षणासंदर्बात बोलताना दानवे म्हणाले, आरक्षण हे जातीसाठी असतं. ते धर्मासाठी नसतं. मुस्लिमांची एखादी जात कुणबी असेल, त्यांच्यात कुणबी आहेत. मुस्लिमांमधील जातीला आरक्षण आहे. परंतु धर्माला नाही. त्यामुळे एखाद्या धर्मामध्ये अशी जात असेल तर त्यांना कुणबी आरक्षण मिळतं. मुस्लिमांना आरक्षण मुद्दा येत नाही परंतु त्यांच्यातील जातींना आरक्षण आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT