Narayan Rane : बाळासाहेबांनी नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी केली नव्हती; ती करायला लावली...: रामदास कदमांचा गौप्यस्फोट

Ramdas Kadam's Secret Explosion : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली नाही, तर उद्धव ठाकरे यांनी ती हकालपट्टी करायला लावली.
Ramdas Kadam-Narayan Rane-Uddhav Thackeray-Balasaheb Thackeray
Ramdas Kadam-Narayan Rane-Uddhav Thackeray-Balasaheb ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 23 June : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली नाही, तर उद्धव ठाकरे यांनी ती हकालपट्टी करायला लावली, त्याचा मी साक्षीदार आहे. नारायण राणे यांना पक्षातून काढून टाका; अन्यथा मी घर सोडून चाललो, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी दिली होती. त्यानंतर राणेंना पक्षातून काढून टाकण्यात आले, असा गौप्यस्फोट माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला.

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एका खासगी यू ट्यूब चॅनेलला मुलाखती दिली. त्यात कदम यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, छगन भुजबळ, मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, सुधीर जोशी, मधुकर सरपोतदार, दिवाकर रावते यांनी शिवसेना (Shivsena) वाढविण्याचे काम केले. नारायण राणे (Narayan Rane) हे आमच्या बरोबरचे आहेत. पण, त्यांनीही शिवसेना मोठी करण्याचे काम केले आहे. हे कोणीही नाकारू शकणार नाही. शिवसेना वाढविण्यात राणे यांचे योगदान आहे, त्यात कुठेही दुमत नाही.

आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जी आजपर्यंत ‘मातोश्री’च्या बाहेर आली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली नाही, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ती हकालपट्टी करायला लावली. त्याचा मी साक्षीदार आहे. नारायण राणे शिवसेनेतून काढून टाका; अन्यथा मी घर सोडून चाललो, असे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना म्हटले होते, असा दावा रामदास कदम यांनी केला.

Ramdas Kadam-Narayan Rane-Uddhav Thackeray-Balasaheb Thackeray
Ramdas Kadam : रामदास कदमांना कोणत्या गोष्टीचे दुःख आजही सलते; शिंदेंच्या कोणत्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी!

माजी मंत्री कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यावेळी अक्षरशः ब्लॅकमेल केले होते. उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपटी करायला लावली होती. कारण, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. हे वास्तव असून त्याचा मी साक्षीदार आहे, हे मी आज पहिल्यांदा बोललो असून आतापर्यंत कधीही बोललो नव्हतो.

मातोश्रीमधील अनेक गोष्टी आम्हाला माहीत आहेत. पण, त्यावर आम्ही बोलणार नाही. कारण आम्ही अजूनही पथ्ये पाळणारी माणसं आहोत. मुलाला पुढं आणण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारता, त्यांची पक्षातून हकालपट्टी करता, हे काय आम्हाला समजत नाही का, असा सवालही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला.

Ramdas Kadam-Narayan Rane-Uddhav Thackeray-Balasaheb Thackeray
BJP Lok Sabha Performance : भाजपची लोकसभा निवडणुकीत 20 कारणांमुळे खराब कामगिरी ; धनंजय महाडिक...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com