Sonu Kalyankar Murder Case Sarkarnama
मराठवाडा

Sonu Kalyankar News: शिवसेना नेत्याच्या हत्येमागचं गुढ उकललं; प्रेयसीची आईचं निघाली मास्टरमाइंड

Sonu Kalyankar Murder Case: शिवसेना नेता सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. प्रेयसीच्या आईनेच सुपारी देऊन हत्या केल्याची कबुली दिली आहे.

Mangesh Mahale

Nanded Crime NEWS: नांदेडमध्ये पाच दिवसापूर्वी शिवसेना नेत्याचा खून झाला होता, या खुनाचं गुढ उकललं आहे. शहरातील श्रीनगर भागात सोनू कल्याणकर या 35 वर्षे तरुणाचा भर रस्त्यावर हल्ला करण्यात आला होता. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर राजकीय वातावरणही तापले होते.

सोनू कल्याणकर याच्या खून प्रकरणाच्या तपासात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोनू याचा खून जुन्या प्रेमसंबधातून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या इंदुबाई मंगनाळे या महिलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेने मराठवाड्यात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रेम प्रकरणातून सोनू याचा खून झाला आहे. तरुणीची आईच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आईनेच कट रचून ही हत्या घडवून आणल्याचं समोर आले आहे. तिने मारेकऱ्यांना लाखो रुपयांची सुपारी देऊन सोनू कल्याणकर याला संपवलं आहे.

सुपारी दिल्याची कबुली

सुरवातीला हा खून संबधीत युवतीच्या भावाने केला असेल, असा संशय पोलिसांना होता. या महिला आरोपीचा मुलगा हा कुख्यात दहशतवादी रिंदा गँगचा सदस्य असून तो कारागृहात आहे.

"जोपर्यंत सोनू मरणार नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही," असे शब्द इंदुबाईने आपल्या मुलाचा मित्र पियुष शिंदे याला म्हटले होते. या सूड भावनेतून तिने बँकेतून लाखो रुपये काढून मारेकऱ्यांना सुपारी दिल्याची कबुली दिली आहे.

६ एप्रिल रोजी काय घडलं होतं?

६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास श्रीनगर भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ३५ वर्षीय सोनू कल्याणकर याच्यावर चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली होती.

कशामुळे काढला सोनूचा काटा

सोनूच कल्याणकर यांचे १०-१२ वर्षांपूर्वी गोलू मंगनाळे याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांना मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले होते, मात्र सोनूने ती ठरलेले लग्न मोडले होते. याचा राग मनात धरुन २०२१ मध्ये गोलू मंगनाळेने सोनूवर गोळीबारही केला होता. या हल्ल्यात सोनू थोडक्यात वाचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT