Rupali Chakankar News: चाकणकर कुटुंबियांना पोलिसांचा पहिला दणका! प्रतिभा चाकणकरांना नोटीस

Ashok Kharat Case shirdi police Notice to Pratibha Chakankar: चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावानेही या पतसंस्थेत 4 खाती असल्याचं निष्पन्न झाले आहे. याबाबच्या चौकशीसाठी पुढील पाच दिवसात हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना दिले आहे.
Ashok Kharat Case shirdi police Notice to Pratibha Chakankar:
Ashok Kharat Case shirdi police Notice to Pratibha Chakankar:Sarkarnama
Published on
Updated on

Shirdi Police News: नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात चाकणकर कुटुंबियांचे टेन्शन वाढलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची आता चौकशी होणार आहे. शिर्डी पोलिसांनी याबाबत त्यांना नोटीस बजावली आहे.

या प्रकरणात राजकीय संबंध असल्याची चर्चा सुरू झाल्याने तपासावरही सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. खरात याच्या विरोधात शिर्डीत सावकारीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. चाकणकर यांच्या खात्यांमधील मोठ्या व्यवहारांमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.

भोंदू खरातच्या विरोधात दाखल असलेल्या सावकारीच्या गुन्ह्यात समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुरू आहे. तपासात चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावनंही या पतसंस्थेत 4 खाती असल्याचं निष्पन्न झाले आहे. याबाबच्या चौकशीसाठी पुढील पाच दिवसात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना दिले आहे.

Ashok Kharat Case shirdi police Notice to Pratibha Chakankar:
PCMC News: घोड्या पेक्षा नाल महाग! महापालिका आर्थिक संकटात असताना सत्ताधाऱ्यांकडून कोट्यवधीची उधळपट्टी

शिर्डी पोलिसांकडून चाकणकर यांच्या दोन पत्यावर पोस्टाने नोटीस पाठवली आहे, त्यामुळे त्यांना पुढच्या पाच दिवसात जबाब देण्यासाठी हजर राहावे लागणार आहे. या नोटीशीनंतर प्रतिभा चाकणकर या चौकशीला कधी हजर राहणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. खरातशी संबधित समता पतसंस्थेतील संशयास्पद खाती आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे व्यवहार यामुळे आता चाकणकर कुटुंबीयांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Case shirdi police Notice to Pratibha Chakankar:
TET Exam: टीईटीमुळे मिळाला न्याय! तब्बल 13 वर्षांनंतर पगार सुरू, कोर्टाचा ZP प्रशासनाला दणका

समता पतसंस्थेत दोन खाती स्वतः प्रतिभा यांच्या नावे आहेत अन्य उर्वरित दोन खाती त्यांच्या मुलांच्या नावे आहेत. या चारही खात्यांमधून गेल्या काही काळात तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. इतकी रक्कम कुठून आली. हे व्यवहार कुणासोबत झाले. याबाबतची चौकशी पोलीस करणार आहेत.

शिर्डीनंतर आता सिन्नर! खरातची 32 खाती

सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेतही अशोक खरात नॉमिनी असलेली 32 खाती आढळली आहेत. या खात्यांची चौकशी आता नाशिक ग्रामीण पोलिस करणार आहेत. खरातचे शिर्डी आणि एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या शहरांतील पतसंस्थांमध्ये इतके प्रभावी कनेक्शन या मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com