Shiv Sena MLA Ramesh Bornare demands municipal land for a sports club in CIDCO N-4 Parijatnagar, while BJP corporators oppose the proposal citing Savata Mali garden reservation. Sarkarnama
मराठवाडा

Ramesh Bornare: शिवसेनेच्या आमदाराने महापालिकेकडे मागितली जागा, भाजपा नगरसेवकांचा विरोध; पत्रातून दिला इशारा, आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष

BJP Corporators Opposition : वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी सिडको एन-4 येथील सावता माळी उद्यानातील एक एकर जागा स्पोर्ट क्लबसाठी मागितल्याने वाद निर्माण झाला असून भाजप नगरसेवकांनी त्याला तीव्र विरोध केला आहे.

Jagdish Pansare

Shivsena-BJP conflict News : राज्याच्या आणि महापालिकेच्या सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजप या दोन पक्षांमधील मतभेद अनेकदा समोर आले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपासोबतची युती तुटली, झेडपीत युती झाली पण ती फक्त कागदावरच. तरीही वेळोवेळी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करत निवडणुक निकालानंतर जुळवून घेण्याचे धोरण ठेवले. आता पुन्हा एकदा एका प्रकरणावरून शिवसेनेचे आमदार आणि भाजपाचे नगरसेवक आमने सामने आले आहेत.

शिवसेनेचे वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी महापालिकेची जागा स्पोर्ट क्लबसाठी मागितल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. सिडको एन-4, परिजातनगर येथे संत सावता माळी उद्यानातील एक एकर जागा बोरणारे यांनी स्पोर्ट क्लबसाठी मागितली आहे. जागा देण्यास भाजपच्या प्रभाग 23 मधील नगरसेवकांनी विरोध केला आहे.

उद्यानाची जागा संस्थेला देऊ नये, अशी मागणी प्रमोद राठोड यांच्यासह बालाजी मुंडे यांनी आयुक्तांकडे केली आहे. सिडको एन-4 भागातील पारिजातनगरमध्ये सावता माळी उद्यानाची आरक्षीत जागा आहे. यातील एक एकर जागा स्पोर्ट क्लबसाठी देण्यात यावी, अशी मागणी वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी पत्राव्दारे केला आहे.

जागा देण्यास प्रभाग-23 मधील भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड, बालाजी मुंडे, सत्यभामा शिंदे यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात आयुक्त जी. श्रीकांत यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सिडकोच्या आरखड्यानुसार उद्यानाच्या पूर्वेला क्रीडांगण यापूर्वीच आरक्षित केले असून, उद्यानाच्या जागेचा वापर इतर कारणांसाठी होऊ नये, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

1980 पासून परिजातनगर प्रतिष्ठाण ही संस्था कार्यरत असून, नागरिकांनी उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे. स्पोर्ट क्बलला जागा देण्यास तीव्र विरोध सुरू आहे. जागेचे आरक्षण बदलल्यास परिसरातील नागरिक आंदोलन करतील, असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे. आता आयुक्त यावर काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT