Shiv Sena news Sarkarnama
मराठवाडा

Shiv Sena news : एकनाथ शिंदेंनी पुन्हा दाखवून दिली ताकद; अंबादास दानवेंच्या साथीने सत्तार, शिरसाट यांच्याकडून मोहीम फत्ते...

Aurangabad district bank election result : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा बँकेत एकूण नऊ संचालक निवडून आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सात संचालकांसह भाजप आहे.

Jagdish Pansare

Shiv Sena latest news : काही महिन्यांपूवी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या भाजपने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती अशा सर्वच निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारली होती. जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पंचवीस-तीस वर्षापासून मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेला या जोरावरच भाजपने दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच छोट्या भावाच्या भूमिकेत पाठवले होते.

औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेचे ताकद दाखवून दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांना सोबत घेत मंत्री अब्दुर सत्तार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हा बँकेत शिवसेनेकडे भाजपपेक्षा अधिक जागा खेचून आणल्या आहेत. आता बँकेत शिवसेना मोठा भाऊ ठरणार आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद या दोन्हीही मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप बहुमतासह स्वबळावर सत्तेवर आहे. महापालिकेत भाजपने शिवसेनेला उपमहापौर पद दिले, मात्र जिल्हा परिषदेत आपल्या मित्र पक्षाला विरोधी पक्षांमध्ये बसवल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या झालेल्या या पीछेहाटीवर शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उघडपणे भाष्य करत जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंडाचे निशाण फडकवले होते.

महायुतीच्या सुहास शिरसाट यांच्या विरोधात सत्तार यांनी आपले पुत्र समीर यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून दबाव तंत्राचा वापर केला होता. याचा फायदा सत्तार यांना औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतील वर्चस्व कायम राखण्यासाठी होताना दिसतो आहे. बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार यांच्यासह पाच संचालक बिनविरोध निवडून आणत सत्तार यांनी यापूर्वीच बाजी मारली होती.

शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा बँकेत एकूण नऊ संचालक निवडून आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सात संचालकांसह भाजप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला दोन संचालक पद तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. जिल्हा बँकेत शिवसेना मोठा भाऊ ठरल्यामुळे अब्दुल सत्तार यांची खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.

बँकेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी अंबादास दानवे यांना महायुतीच्या तंबूत आणत महाविकास आघाडीला धक्का दिला होता. निवडणुकीधीच महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये फाटाफूट झाली. त्याचा फटका प्रत्यक्ष निवडणुकीतही बसला. आघाडीला २० पैकी केवळ एकाच जागेवर विजय मिळविता आला आहे. महायुतीने या निवडणुकीत स्थानिकप्रमाणे वर्चस्व राखले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT