Shivsena News : विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वाधिक सहा आमदार निवडून आले. या शिवाय 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा पक्षाने जिंकली आणि महायुतीची लाज राखली. एवढे घवघवीत यश मिळाल्यानंतरही जिल्ह्यात शिवसेनेची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट, मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल, माजीमंत्री तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा पक्ष आणि नेत्यांशी तुटलेला संपर्क या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उद्याच्या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक यश मिळवून दिलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची अवस्था अशी का झाली? याची कारणे उद्याच्या पदाधिकारी बैठकीत शिंदेकडून शोधली जाणार आहेत.
आगामी जिल्हा परिषद आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांना विस्कटलेली पक्षाची घडी पुन्हा बसवण्यात यश येते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) राज्यभरात 60 आमदार निवडून आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक सहा आमदार विजयी झाले. मात्र एकनाथ शिंदे यांनी जेव्हा राज्यात आभार दौरे सुरू केले तेव्हा त्यांना संभाजीनगरकरांचा विसर पडला. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून शिंदेंचे हेलीकाॅप्टर इतर जिल्ह्यातील आभार दौऱ्यांसाठी उडाले, पण शहरात येण्यासाठी शिंदेंना दीड वर्ष लागले.
उद्या (ता.8) रोजी एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचा मुंबईत पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्यांच्याच वार्डात छोटेखानी होणाऱ्या सभेला आभार सभा संबोधण्यात आले आहे. तर दुपारी जिल्ह्यातील सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुकानिहाय पक्षाचा आढावा शिंदे यांच्याकडून घेतला जाणार आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून सायंकाळी ते पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत. काही तासांच्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यापुर्वी अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे शिंदे यांच्या शासकीय दौऱ्यात ज्या मंत्री आणि आमदारांचा संदर्भ नावांसह पत्रात देण्यात आला आहे, त्यातून आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे उद्या, एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात सत्तार सहभागी होणार की नाही? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सत्तार हे सध्या फक्त तणाने शिवसेनेत आहेत, मनाने नाही, असेही बोलले जाते. विधानसभा निवडणुकीत पराभव होता होता राहिल्याने सत्तार यांनी आता आपला सगळा वेळ हा मतदारसंघासाठीच राखीव ठेवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.