Ambadas Danve Omprakash Rajenimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve Omprakash Rajenimbalkar : 'कोण होतास तू, आता काय झालास!' दानवेंची ओमराजेंना कोपरखळी

Ambadas Danve takes a sharp dig at Omprakash Rajenimbalkar during Fadnavis Latur drought visit : फडणवीसांच्या लातूर दुष्काळी दौऱ्यात ओमप्रकाश राजेनिंबाळकर सहभागी; फोटो शेअर करत अंबादास दानवेंची 'पळालेल्यांची अवस्था' अशी खोचक पोस्ट

Pradeep Pendhare

Latur Drought Tour : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळाची पाहणीसाठी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्यासह महायुतीतील मित्रपक्षाचे लोकप्रतिनिधी देखील आहेत.

याच दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेले ओमप्रकाश राजेनिंबाळकर देखील सहभागी झाले आहेत. त्यांच्या सहभागाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार कोपरखळी मारली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस दुष्काळी दौऱ्यावर असताना, माध्यमांशी संवाद साधत आहे. तो फोटो शेअर करत अंबादास दानवे यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांना जोरदार कोपरखळी लागावली आहे. या फोटोत पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधत आहे. आणि मागे खासदार ओमप्रकाश उभे आहेत. त्यांचा पुसटसा चेहरा दिसतो आहे. त्याला लाल रंगाने सर्कल करत, हा फोटो शेअर करताना, कोण होतास तू, आता काय झालास! अशी कमेंट दानवे यांनी केली आहे.

हा फोटो शेअर करताना अंबादास दानवे यांनी, हॅशटॅग म्हणून पळालेल्यांची अवस्था, एवढेच दोन शब्द वापरले आहे. अंबादास दानवे यांनी हे दोन शब्द वापरून, शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena UBT) उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या प्रत्यकाला एकाचवेळी अंगावर घेतल्याचे दिसते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूरमधील दुष्काळी दौरा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. काही शेतकऱ्यांना दुष्काळाचा दाहकता सांगताना मुख्यमंत्र्यांसमोर अश्रू अनावर झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, दोन दिवसात दुष्काळाचा अध्यादेश काढतो असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे.

लातूरमधील तावशी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट न दिल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी तुळजापूर महामार्गावर उतरले असून, रास्ता रोको केला आहे. काही शेतकऱ्यांनी महामार्ग रोखण्यासाठी पाण्याअभावी सुकलेला सोयाबीन आणून तो जाळला आहे. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT