Halgaon College Ragging : रॅगिंगप्रकरणी 6 विद्यार्थ्यांवर कारवाई; एका सत्रासाठी निलंबन, हॉस्टेलमधून कायमची हकालपट्टी

Six students suspended after a ragging inquiry at Halgaon agriculture college : हाळगावच्या शासकीय कृषी महाविद्यालयातील प्रकरण; चौकशी समितीच्या अहवालानंतर प्रशासनाची कारवाई, प्रत्येक विद्यार्थ्यावर 1,000 दंड
Halgaon College Ragging
Halgaon College RaggingSarkarnama
Published on
Updated on

Halgaon college ragging case : जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयात रॅगिंग प्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर महाविद्यालय प्रशासनाने कारवाई केली आहे.

चौकशी समितीच्या अहवालानंतर या विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित करण्यात आले असून, वसतिगृहातून कायमचे काढून टाकण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यावर एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील शासकीय कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून (Student) रॅगिंग करत अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी चार विद्यार्थ्यांविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या (College) प्राचार्यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. समितीला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. चौकशी समितीच्या अहवालानुसार सहा विद्यार्थी दोषी आढळले. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने संबंधित सहाही विद्यार्थ्यांवर शैक्षणिक कारवाई केली. त्यांना एका सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Halgaon College Ragging
Social Boycott Maharashtra : प्रेमविवाह केला म्हणून जातपंचायतीचा दंड अन् बहिष्काराचा आरोप; पोलिसांकडे तक्रार

याशिवाय, संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वसतिगृहातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे. रॅगिंगच्या घटनेत झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी प्रत्येक दोषी विद्यार्थ्यावर एक हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.

Halgaon College Ragging
Shivsena Nilesh Sambare FIR : दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, आश्रमशाळा व्यवस्थापनावर गुन्हा; शिवसेनेच्या नीलेश सांबरे यांच्यासह 5 जण रडारवर

या कारवाईमुळे महाविद्यालयीन परिसरातील रॅगिंगच्या घटनांबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील पोलिस तपास आणि पुढील कायदेशीर कारवाईकडेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com