Nagesh Patil Ashtikar Hingoli Sarkarnama
मराठवाडा

Nagesh Patil Ashtikar Hingoli : 730 दिवस, फक्त 7 भेटी..; नागेश आष्टीकरांनी हिंगोलीसाठी नेमकं काय केलं? शिवसेना ठाकरे पक्षाचा हल्लाबोल

Shiv Sena UBT questions Hingoli MP Nagesh Patil Ashtikar performance after alleging only 7 constituency visits in 730 days : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या खासदारांविरोधात आता शिवसेना ठाकरे पक्षाने आक्रमक मोहीम सुरू केली आहे.

Pradeep Pendhare

Hingoli Lok Sabha News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या खासदारांविरोधात आता शिवसेना ठाकरे पक्षाने आक्रमक मोहीम सुरू केली आहे.

पक्ष सोडून गेलेल्या खासदारांनी इतके दिवस मतदारसंघासाठी नेमकं काय काम केलं, याचा लेखाजोखा आता सार्वजनिकपणे मांडला जात आहे.

या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर शिवसेना ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे मुखपत्र ‘सामना’मधून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, तब्बल 730 दिवसांच्या कालावधीत खासदार नागेश पाटील आष्टीकर हे फक्त 7 वेळा हिंगोली मतदारसंघात आले. त्यामुळे निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या आष्टीकरांनी प्रत्यक्षात मतदारसंघासाठी नेमके काय केले, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी गावागावात फिरून प्रचार केला आणि आष्टीकरांना विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली. मात्र आता त्याच एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करून आष्टीकरांनी शिवसैनिकांच्या विश्वासाला तडा दिला, असा आरोप केला जात आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करताना ‘मतदारसंघासाठी निधी मिळत नाही, त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत’ असे कारण आष्टीकर यांनी दिले होते. मात्र विरोधकांचा सवाल आहे की, लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांनी स्वतः मतदारसंघात किती वेळा भेट दिली? नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या का?

शिवसेना ठाकरे पक्षाचे हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले की, हिंगोलीकरांची फसवणूक झाली आहे. आष्टीकर खरोखर किती वेळा मतदारसंघात आले आणि त्यांनी नेमकं काय काम केलं, हा संशोधनाचा विषय आहे. पक्ष बदलून गेलेल्या आष्टीकरांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल.

दरम्यान, बंडखोर खासदारांविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाने सुरू केलेली ही ‘हिशेब मागा’ मोहीम आगामी काळात आणखी आक्रमक होण्याची चिन्हे दिसत असून महाराष्ट्राच्या राजकारणात यावरून नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT