Marathwada Political News : महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन सहा महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. निवडणुकीआधी आपल्या जाहीरनाम्यात आणि प्रचार सभांमधून दिलेल्या आश्वासनांचा विसर या सरकारला पडला आहे. विशेषत: शेतकर्यांना कर्जमाफी देऊ हे दिलेले आश्वासन सरकार सोयीस्कररित्या विसरले आहे. यासह अशा अनेक आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी येत्या पाच ते 12 जून दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार आहे.
'क्या हुआ तेरा वादा' असे विचारत उद्धवसेना महायुती सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहे. या संदर्भात मुंबईत नुकतीच मराठवाडा विभागाची स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यातील शिवसेनेचे दोन्ही नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे उपस्थित होते. (Shivsena UBT) शिवसेनेचे जेष्ठ नेते विश्वनाथ नेरुळकर, संपर्कप्रमुख उपनेते विनोद घोसाळकर यांनी या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नुकतेच शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील पाणी प्रश्नावर 'लबाडांनो पाणी द्या' या घोषवाक्यखाली मोठे जन आंदोलन उभारले होते. महिनाभर चाललेल्या या जन आंदोलनाचा समारोप युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित हल्लाबोल मोर्चा ने करण्यात आला.त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठे जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
अवकाळी आणि अनियमित पावसामुळे झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई अनुदान, पीक विमा योजना, तसेच शेतकरी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन अशा विविध प्रश्नांवर महायुती सरकारला घेरण्याची तयारी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यानुसार मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाच ते बारा जून या दरम्यान 'क्या हुआ तेरा वादा' या शीर्षकाखाली शेतकऱ्यांचे जन आंदोलन होणार आहे.
शेतकरी, कामगार, मजूर, महिला, विद्यार्थी आणि ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावर महायुतीचे सरकार सत्तेवर आरुढ झाले त्या लाडक्या बहिणींचीही सरकारने फसवणूक केली आहे. या सगळ्याचा जाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेतकरी जन आंदोलनाच्या माध्यमातून विचारणार आहे. या आंदोलनाची तयारी पक्षाच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे.
सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांप्रति केलेल्या घोषणांचा विसर पडलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी "क्या हुआ तेरा वादा"? या शिर्षकाखाली 5 जून 12 जून या कालावधीत मराठवाडयात शेतकऱ्यांचे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी शिवसेना भवन, मुंबई येथे शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील उपनेते, जिल्हाप्रमुख आदींची बैठक पार पडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.