बीड : राज्यात कोणतीही आघाडी आणि युती असली तरी जिल्ह्यात मात्र भलतंच काही सुरु असत. आता महाविकास आघाडीत शिवसेना -राष्ट्रवादी भाऊ भाऊ असले तरी जिल्ह्यात व विशेषत: बीड मतदार संघात या दोन पक्षांत विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. (Beed Shivsena) याचाच पुढचा अंक म्हणजे मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या विकास कामांच्या उद॒घाटन कार्यक्रमाला शिवसेनेनेच विरोध केला आहे. (Ncp) ‘दादा तुमच्या आमदारांना महाविकास आघाडीचा धर्म शिकवा’,असे डिजीटल व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असलेल्या उद्घाटन सोहळ्याचा जाहीर निषेध, अशा पोस्ट माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्याकडून व्हायरल केल्या जात आहेत. (Ajit Pawar)
सचिन मुळूक यांनी अजित पवार जिल्ह्यात आले तर त्यांना काळे झेंडे दाखवू किंवा ऑनलाईन असतील तरी दाखवू अशी भूमिका दोन दिवसांपूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून सचिन मुळूक यांना बीड शहर व शिवाजीनगर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यानंतरही मुळूक यांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.
मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी विशेष मंजुरी दिलेल्या कामांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून आडकाठी आणली जात असल्याचा सचिन मळूक यांचा आरोप आहे. जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत खाटांच्या इमारतीसह इतर विविध १०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन मंगळवारी अजित पवार ऑनलाईन करणार आहेत. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर करत आहेत. आता सचिन मुळूक यांनी थेट काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिल्याने प्रशासनतही सतर्क झाले आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यातही महाविकास आघाडी एकत्र आली.
पण, राष्ट्रवादीने या दोन्ही पक्षांना सत्तेच्या वाट्यात झटका दिला. नंतरही या दोन पक्षांची उपेक्षाच सुरु आहे. मात्र, आतापर्यंत शिवसेना व काँग्रेस या पक्षांनी कष्टी होण्यापेक्षा पुढची भूमिका घेतली नव्हती. आता शिवसेनेच्या सचिन मुळूक यांनी काळे झेंडे दाखविण्याचाच इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.