Bjp Mla Lonikar Reaction News, Jalna Sarkarnama
मराठवाडा

Jalna : शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढाल तर तुमच्या शंभर पिढ्या बरबाद होतील..

Mla Babanrao Lonikar : महाभारतामध्ये शिशुपालाच्या शंभर अपराधानंतर त्याचा देखील अंत झाला होता.

सरकारनामा ब्युरो

Mla Lonikar News : छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्र किंवा भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आदर्श राजे होते आहेत आणि राहतील. त्यामुळे सर्वपक्षीय राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या लोकांच्या शंभर पिढ्या बरबाद होतील, परंतु शिवरायांचा आदर्श मिटणार, संपणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वाचाळवीरांवर टीकास्त्र सोडले.

मागील अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणे किंवा अपशब्द वापरला जात आहे. (Babanrao Lonikar) ही बाब सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंताजनक आणि लाजिरवाणी आहे. (Marathwada) सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना तारतम्य बाळगणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ राजकारणाचा विषय नसून जनतेच्या कल्याणासाठी लोकोपयोगी राज्य कारभार कसा चालवावा याचा आदर्श प्रत्येक राजकीय व्यक्तीने आपल्या डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक असल्याचेही लोणीकर म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत की ज्यांना रयतेचे राजे असे म्हटले जाते. त्यामुळे शिवाजी महाराजांसारखा रयतेचा राजा पुन्हा होणे नाही ही बाब राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावी.

ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी काम केले त्याच तोलामोलाचे काम करणे जरी शक्य नसले तरी त्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेसाठी काही करता येऊ शकते काय? यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

महाभारतामध्ये शिशुपालाच्या शंभर अपराधानंतर त्याचा देखील अंत झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना माहिती घेऊन अभ्यास करून आणि आदरयुक्तच बोललं पाहिजे, असेही लोणीकरांनी सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT