Jalna : दोन वर्षांपुर्वी माफी मागितली होती, आता पुन्हा मागतो..

Raosaheb Danve : नाशिक येथे पत्रकरांनी मला प्रश्न विचारला तेव्हा अनावधानाने महाराजांचा एकेरी उल्लेख झाला होता.
Railway Minister Raosaheb Danve News, Jalna
Railway Minister Raosaheb Danve News, JalnaSarkarnama
Published on
Updated on

Raosaheb Danve News : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतांनाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ काल सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. Jalna त्यानंतर दानवे यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली. परंतु व्हायरल झालेला व्हिडिओ हा दोन वर्षापुर्वीचा आहे. Bjp त्यावेळी राज्यपालांच्या विधानावर विचारलेल्या प्रतिक्रियेत आपल्याकडून अनावधानाने शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी झाला होता.

Railway Minister Raosaheb Danve News, Jalna
Raosaheb Danve: कोश्यारी, त्रिवेदी, लाड यांच्यानंतर आता रावसाहेब दानवेंकडून शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान

त्याबद्दल मी तेव्हा देशातील जनतेची माफी मागितली होती. आता पुन्हा मागतो, पण आता अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य आपण केले नसल्याचा खुलासा रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Marathwada) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान करत खळबळ उडवून दिली होती. राज्यपाल हटावच्या मागणीसाठी अजूनही राज्यात आंदोलने सुरू आहेत.

त्यातच भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड यांनी देखील शिवाजी महाराजांचा अवमान करणारी विधाने केली. यावरून राजकीय वातावरण तापलेले असतांनाच काल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा देखील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला. यात दानवे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतांना दिसतात. त्यामुळे दानवे यांच्याविरोधात देखील संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमांमधून उमटायला लागल्या.

सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर काल शिवप्रेमी नागरिकांनी ढोल बजाव आंदोलन करत राज्यपाल हटावची मागणी केली होती. त्यानंतर आता रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबादेतील घरासमोर ढोल वाजवून जाब विचारणार असल्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. तत्पुर्वीच रावसाहेब दानवे यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण दिले. दानवे म्हणाले, काल व्हायरल झालेला व्हिडिओ हा दोन वर्षापुर्वींचा आहे.

नाशिक येथील एका कार्यक्रमात पत्रकरांनी राज्यपालांच्या विधानासंदर्भात मला प्रश्न विचारला तेव्हा बोलतांना माझ्याकडून अनावधानाने शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी झाला होता. त्यानंतर माझ्यावर टीकेची झोड उठली होती, मी तात्काळ देशाची माफी मागितली होती. आता पुन्हा माफी मागतो. पण काल व्हायरल झालेला व्हिडिओ हा दोन वर्षापुर्वीचा आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुठलेही चुकीचे विधान केलेले नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com