सुशांत सांगवे
Latur News : आम्ही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, मुख्यमंत्र्यानी शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या पुतळ्याबाबत जाहीर केलेल्या घोषणेला मुद्दामहून जर कोणाकडून खो घालण्याचे प्रयत्न झाले, तर लक्षात ठेवा सरकारकडेही अधिकार आहेत. गरज पडल्यास हे अधिकार आम्ही वापरू. महापालिकेच्या वर नगरविकास खाते आणि राज्य सरकार आहे, याचा महापालिकेने विचार करावा, अशी तंबी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या पुतळ्यावरून लातुरात गेल्या काही दिवसांपासून राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील-चाकूरकर यांचा महापालिकेच्या आवारातच आणि तोही सरकारच्या निधीतून उभा केला जाईल, अशी घोषणा ७ जानेवारी रोजी केली होती.
पण, आता काँग्रेसने हा पुतळा आदर्श कॉलनी भागातील ग्रीन बेल्टमध्ये करण्याचा विचार पुढे आणला आहे. याला भाजपमधून तिव्र विरोध दर्शवला जात आहे. त्यासाठी भाजपकडून शहरात आंदोलनही करण्यात आले.
या विषयावर बोलताना पालकमंत्री भोसले म्हणाले, आम्ही पक्षाचा विचार न करता, कुठला भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. असे असताना मुख्यमंत्र्यांनी चाकूरकर यांच्या पुतळ्याबाबत जाहीर केलेल्या घोषणेला वेगळे वळण दिले जात आहे.
या विषयाला राजकीय रंग द्यायचा प्रयत्न होत आहे. वास्तविक, असे होता कामा नये. चाकूरकर यांचा पुतळा योग्य जागेत डॉ. अर्चना पाटील-चाकूरकर आणि चाकूरकर परिवाराशी चर्चा करून उभारला गेला पाहीजे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे तो महापालिकेत तर झाला पाहीजे. महापालिकडेकडून ती माझी अपेक्षा आहे. मुख्यंमत्र्यांनी जाहीर केलेल्या घोषणेला महापालिकेकडून अडवण्याचे काम होऊ नये.
पावसाने लातूरकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेने यंदाची स्थिती, प्रामुख्याने लातूर जिल्ह्यात चिंता करण्यासारखी आहे. म्हणून धरणातील पाणीसाठा राखून ठेवला आहे. पिण्याच्या पाण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यात अडचणी येणार नाहीत, याकडे लक्ष दिले गेले आहे. पण, अलिकडेच परतीच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला जात आहे. किमान परतीचा पाऊस तरी लातूर भागात व्हावा, अशीच प्रार्थना आहे. त्यामुळे काहीशी चिंता दूर होईल. आपल्या जिल्ह्यात ९१ ते ९२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊस झाला नाही तर या पेरण्याही धोक्यात येतील. याकडेही सरकारचे, जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.