Archana Chakurkar Vs Amit Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Shivraj Patil Chakurkar : ...अखेर शिवराज पाटील चाकूरकरांनी सुनबाईंनाच दिला आशीर्वाद, म्हणाले...

Archana Chakurkar Vs Amit Deshmukh: अमित देशमुख विरुद्ध अर्चना चाकूरकर अशी लढत यावेळी लातूरमध्ये पाहायला मिळणार आहे.

Jagdish Pansare

Latur City Assembly Constituency: लातूर विधानसभेच्या लातूर शहर मतदार संघातून भाजपने माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे अमित देशमुख विरुद्ध अर्चना चाकूरकर अशी लढत यावेळी लातूरमध्ये पाहायला मिळणार आहे.

अमित देशमुख यांनी अर्चना पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर देवघरातील देव आमच्या सोबत असल्याचे विधान केले होते. मात्र देवघरातील या देवाने मी कोणाच्याही प्रचाराला जाणार नाही,असे म्हणत देशमुख यांचे विधान खोडून काढले.

अर्चना पाटील या भाजपच्या उमेदवार असल्या तरी त्या माझ्या कुटुंबातल्या आहेत, माझा त्यांना आशीर्वाद आहे. पण म्हणून मी त्या पक्षाचा आहे,असे कोणी समजू नये. मी कोणत्याच पक्षाच्या प्रचाराला जाणार नाही, असेही शिवराज पाटील चाकूरकर यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस (Congress) पक्षात मी गेल्या 50-55 वर्षांपासून काम करत आलो आहे. कधीच पक्ष बदलण्याचा विचार माझ्या मनात आला नाही. आज माझ्या कुटुंबातील व्यक्ती दुसऱ्या पक्षाकडून लातूर शहर मतदार संघात निवडणूक लढवत आहे.

कुटुंबातली व्यक्ती म्हणून माझा त्यांना आशीर्वाद आणि सदिच्छा आहेत. मात्र आपण कोणाच्याही प्रचाराला जाणार नसल्याचे चाकूरकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाने आपल्याला न मागता भरपूर काही दिले. विधानसभा, लोकसभा, दिल्लीत सरकारमध्ये मंत्रीपद, सभापती होण्याचा मान मला काँग्रेस पक्षाने दिला असेही चाकूरकर यांनी म्हटले आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासून काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. आधी विलासराव देशमुख आणि आता त्यांचे चिरंजीव अमित देशमुख हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजपने (BJP) कायम या मतदारसंघात काँग्रेस सोबत मैत्रीपूर्ण लढत केल्याचा आरोप होत आला आहे.

यावेळी मात्र काँग्रेसमधीलच जेष्ठ नेत्याच्या घरातील व्यक्तीला देशमुख यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवत भाजपने यावेळी आपण ही निवडणूक ताकतीने लढवणार असल्याचे दाखवून दिले आहे.आता ही जागा भाजप किती ताकतीने लढला हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT