Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News
Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : शिंदे सरकारचे शंभर दिवस शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, अधोगतिचे..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांचे बंड, त्यानंतर झालेले सत्तांतर आणि शिंदे-फडणवीस सरकारला पुर्ण झालेले शंभर दिवस यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी खोचक टीका केली आहे. शिंदे (Eknath Shinde) सरकारचा मिंधे सरकार असा उल्लेख करत दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून टोला लगावला आहे.

(Aurangabad) दानवे यांनी शिंदे सरकारच्या शंभर दिवसांचे मुल्यमापन करतांना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मिंधे सरकारचे १०० दिवस.. वाढत्या शेतकरी आत्महत्येचे, गुजरातची तिजोरी भरण्याचे, फॉक्सकॉन गमावल्याचे आणि बेरोजगारी-अधोगतीचे. एकीकडे शंभर दिवसात सातशे निर्णय घेत हे सरकार किती गतीशील आहे हे सांगण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे. (Marathwada)

तर दुसरीकडे शिवसेनेसह महाविका आघाडीतील काॅंग्रेस-राष्ट्रवादी मात्र या सरकारला स्थगिती सरकार म्हणून हिणवत आहे. शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. महाविकास आघाडी सरकार पाडण्यापेक्षा शिंदे आणि भाजपला शिवसेना संपवण्यात अधिक स्वारस्य असल्याचे एकंदरित त्यांच्या राजकीय घडामोडींवर दिसून आले होते.

धनुष्यबाण हे चिन्ह आणि खरी शिवसेना कोणाचाही हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या कोर्टात सुरू आहे. यावर कोणत्याही क्षणी निर्णय येऊ शकतो, या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने शंभर दिवस पुर्ण केले आहेत.

यावरून अंबादास दानवे यांनी अगदी मोजक्या शब्दात शिंदे सरकारच्या कारभाराचे विश्लेषण केले आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, गुजरातमध्ये पळवले जाणारे मोठे उद्योग, वाढती बेरोजगारीचा दाखला देत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT