Nana Patole : चंद्रकांतदादा ही कुठली संस्कृती, आई-वडिल आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ

दुसऱ्यांचे घर तोडणे हा भाजपचा धंदा असून शिवसेनेला तोडण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. आज जे काही चित्र आपण राज्यात पाहतोय, त्याला भाजपच जबाबदार आहे. ( Nana Patole, Congress)
Nana Patole-Minister Chandrakant Patil News, Aurangabad
Nana Patole-Minister Chandrakant Patil News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : आई-वडिलांना शिव्या द्या, पण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना शिव्या सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा संदर्भ देत दिला होता. यावरून आता चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधतांना, चंद्रकांत दादा ही कोणती तुमची संस्कृती, आमच्यासाठी आई-वडिल सर्व श्रेष्ठ आहे, असे म्हणत त्यांनी सुनावले आहे. बीड येथे ओबोसी मेळाव्याला जाण्यापुर्वी (Aurangabad) औरंगाबाद विमानतळावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटलांच्या विधानबद्दल विचारले असता पटोले म्हणाले, आई-वडिलांना शिव्या द्या, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दिलेल्या शिव्या सहन करणार नाही, ही कुठली संस्कृती आहे. आई-वडिल आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, जन्मदात्याबद्दल अभिमान असला पाहिजे. त्यांचे संरक्षण आणि सर्वोत्तपरी काळजी घेणे ही प्रत्येकाचे कर्तव्य असते. प्रत्येक मुलाने ते पार पाडणे अपेक्षित असते.

त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे विधान कुठल्या हिंदु संस्कृतीत बसणारे आहे. एकीकडे हिंदूच्या नावावर मतं माघायची आणि दुसरीकडे हिंदूंची संस्कृती संपवायची असाच हा प्रकार म्हणावा लागेल. सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाण्याचा हा भाग आहे. दिल्लीपुढे शरणागती पत्करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही, असा इशारा देखील पटोले यांनी यावेळी दिला.

Nana Patole-Minister Chandrakant Patil News, Aurangabad
PFI : पीएफआयच्या रडारवर मोदी, शहा, फडणवीस, ठाकरे.. ; पत्रातून धक्कादायक माहिती

शिवसेना व त्या पक्षाच्या निवडणुक चिन्हाचा सुरू असलेला वाद यावरून देखील पटोले यानी भाजपला सुनावले. दुसऱ्यांचे घर तोडणे हा भाजपचा धंदा असून शिवसेनेला तोडण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. आज जे काही चित्र आपण राज्यात पाहतोय, त्याला भाजपच जबाबदार आहे. आता ते लांबून हा सगळा तमाशा पाहत आहेत. दुसऱ्यांचे घर तोडणे हा भाजपचा धंदा आहे आणि त्यात ते यशस्वी झाले असल्याचा आरोप देखील पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com