Cm Eknath Shinde-Chandrakant Khaire News, Aurangabad
Cm Eknath Shinde-Chandrakant Khaire News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : बोम्मई ऐकत नाहीत, मग शिंदे गृहमंत्र्यांकडे काॅफी प्यायला गेले होते का ?

सरकारनामा ब्युरो

Chandrakant Khaire : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद चिघळू नये, बोम्मई यांचे चिथावणीखोर विधाने बंद व्हावीत यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेले होते. Karnataka त्यांच्यात गुप्त बैठक झाली, मग तरीही कर्नाटकचे मुख्यमंत्री ऐकत नाहीयेत. मग नेमकं या बैठकीत काय झाले? का? आमचे मुख्यमंत्री शिंदे गृहमंत्र्यांकडून फक्त काॅफीच पिवून आले, असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.

राज्यात कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादावरून वातावरण तापले आहे. दोन्ही राज्यात आंदोलने आणि आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. (Chandrakant Khaire) कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक भूमिका घेत आहे, तर महाराष्ट्रातील सरकार नरमाईची भूमिका घेतांना दिसत आहे. (Shivsena) या वादावर तोडगा निघावा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चिथावणीखोर वक्तव्य करू नयेत, यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्याकडे बैठक देखील झाली.

बोम्मई यांनी शहा यांना वाद थांबवण्याचा शब्द देखील दिला. पण कर्नाटकात पोहचताच बोम्मई यांनी पुन्हा महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत डिवचले. नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात याचे पडसाद उमटले. राज्य सरकारने कर्नाटकला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी देखील झाली. या सगळ्या वादावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

खैरे म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटता राहावा, अशीच तर भाजपची इच्छा नाहीयेना. कारण दोन राज्यातील हा वाद शांत व्हावा, यासाठीच दर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशाच्या गृहमंत्र्यांना दिल्लीत जाऊन भेटले होते. अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली, मग त्यानंतर कर्नाटकच्या भूमिकेत बदल दिसायला हवा होता.

पण उलट त्यांचे मुख्यमंत्री अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मग नेमकं अमित शहा सोबतच्या बैठकीत झाले तरी काय ? याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाहीत. आमचे मुख्यमंत्री तिथे फक्त काॅफी प्यायला गेले होते का? असा सवाल देखील खैरे यांनी या निमित्ताने केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT