Raosaheb Danve, Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : मुख्यमंत्री बदलण्याची ताकद माझ्यात; 'या' किरकोळ व्यक्ती माझं काय करणार? सत्तारांचा दानवेंवर निशाणा

Shivsena Candidate Abdul Sattar: अब्दुल सत्तार हे या मतदारसंघातून पुन्हा रिंगणात आहे. अब्दुल सत्तार यांनी तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. आता त्यांना चौथ्यांदा आमदार व्हायचंय! त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे.

Mangesh Mahale

मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो, असं विधान अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. ते सध्या सिल्लोड मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. अजिंठा येथे मंगळवारी झालेल्या सभेत सत्तार यांनी केलेल्या विधानामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीमधील रावसाहेब दानवे व मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातही चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

जर मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो, तर हे किरकोळ लोक माझे काय करणार, अशा रोखठोक सवाल अब्दुल सत्तार यांनी केला. त्यांनी अप्रत्यपणे भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि विरोधकांवर यांच्यावर निशाणा साधला. राज्यात जे मोठे पाच नेते आहेत, त्यात माझे नाव आहे, यावरुनही काही जण माझा व्देष करीत असतात, असे सत्तार म्हणाले.

जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ अशी ओळख आहे. विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार हे या मतदारसंघातून पुन्हा रिंगणात आहे. अब्दुल सत्तार यांनी तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. आता त्यांना चौथ्यांदा आमदार व्हायचंय! त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे.

गेली विधानसभा निवडणूक (२०१९)अब्दुल सत्तार यांनी शिवसनेच्या तिकीटावर लढवली होती.काँग्रेसने माणिकराव पलोडकर हे त्यांच्या विरोधात होते. निवडणुकीत सत्तार विजयी झाले होते. त्यांना एकूण १ लाख २२ हजार ६२७ मते मिळाली होती. तर पलोडकर यांना एकूण ९८ हजार १६२ मते मिळाली होती. अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या तिकिटावर २०१४ ची निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे सुरेश बनकर होते. फक्त १३ हजार ९२१ मतांनी सुरेश बनकर यांचा पराभव झाला. अब्दुल सत्तार यांना एकूण ९६ हजार ३८ मते मिळाली होती.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आपलाच विजयी होईल, असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार (Abdul satttar) यांना आहे. या मतदारसंघातील लढतीवरुन दोन कार्यकर्त्यांमध्ये पैज लागली आहे. 500 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून ही पैज लावण्यात आली आहे. निवडणूक मताधिक्यांवरुन (लीडवरुन) ही शर्यत लावण्यात आली आहे. नदीम (दादा) शेख आणि अब्दुल कुरेशी या दोन कार्यकर्त्यांमध्ये ही पैज आहे. पैज जिंकणाऱ्याला नवी बुलेट गाडी देण्याचं वचन या पैजेतून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT