Shivsena Shinde Group Rally News, Aurangabad
Shivsena Shinde Group Rally News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News: खैरे, दानवे मुंबईत, तर शिंदे गटाकडून शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात उद्धवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु आज बाळासाहेबांना स्मृतीस्थळावर जावून अभिवादन करण्यासाठी तसेच विधीमंडळातील तैलचित्राच्या अनावरणासाठी उपस्थितीत राहण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे प्रमुख नेते मुंबईत गेले आहेत.

तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) व त्यांच्या पक्षाच्या वतीने बाळासाहेबांची जयंती दणक्यात साजरी करण्यात आली. (Shivsena) या निमित्ताने शहरातून हिंदू जनजागृती महारॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. त्यामुळे उद्धवसेनेचे नेते मुंबईत तर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शक्तीप्रदर्शन असे चित्र पहायला मिळाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने राज्यात व शहरात देखील ठाकरे आणि शिंदे गटात स्पर्धा पहायला मिळाली. ठाकरे गटाकडून जिल्हाभरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पण नेमकं जयंतीच्या दिवशीच खैरे, दानवे हे दोन्ही महत्वाचे नेते शहरात नव्हते. तर दुसरीकडे राज्यातील सत्तांतर आणि पक्षात पडेल्या फुटीनंतरची बाळासाहेबांची ही पहिलीच जंयती असल्याने शिंदे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, संजय शिरसाट, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत हिंदू जनजागृती महारॅली काढण्यात आली. एका जीपवर बाळासाहेंबाचा अर्धाकृती पुतळा ठेवून शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत तरुणांची मोठी गर्दी पहायला मिळाली.आतापर्यंत शिवसेनेकडून अशी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले जायचे.

आता शिंदेगटाकडून तसाच प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उद्धवसेनेशी दोन हात करावे लागणार असल्यामुळे शिंदे गटाकडून शाखा स्थापन करणे, वार्डावार्डात बैठका घेणे, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अशा कामांना वेग दिला जात आहे. त्यामुळे भविष्यात शहरात या दोन्ही सेनेकडून शक्तीप्रदर्शन आणि कुरघोडीचे राजकारण पहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT