Sanjay Shirsat : बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारलं पाहिजे..

Marathwada : ते महाराष्ट्राचे नाही तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी लाखो शिवसैनिक घडवले, त्यांनी आम्हाला राजकारणात मोठं केल.
Mla Sanjay Shirsat News, Aurangabad
Mla Sanjay Shirsat News, AurangabadSarkarnama

Shivsena : बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्त औरंगाबादेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून हिंदू जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांनी (Balasaheb Thackeray) बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जंयती साजरी करण्याचा अधिकार नाही, हक्क नाही अशी टीका देखील उद्धवसेनेकडून केली जात आहे.

Mla Sanjay Shirsat News, Aurangabad
Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी नांदी; ठाकरे गट - वंचित युतीची अधिकृत घोषणा

यावर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आम्हाला बाळासाहेबांची जयंती साजरी करण्याचा अधिकार नाही असं म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे, असे म्हणत संताप व्यक्त केला. (Shivsena) बाळासाहेब ठाकरे यांनी या देशाला, राज्याला स्वाभीमान शिकवला, त्या बाळासाहेबांची जयंती ही प्रत्येकाने साजरी केलीच पाहिजे, असेही ते म्हणाले.

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना दुभंगली. बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशा दोन नव्या नावांनी ती आता ओळखली जाते. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी होत असतांना आता बाळासाहेबांचे, त्यांच्या विचारांचे खरे वारसदार कोण? यावरून राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

औरंगाबादेत पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी शहरातून भव्य रॅली काढली. बाळासाहेबांचा अर्धाकृती पुतळा जीपवर ठेवून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांनी संजय शिरसाट यांना ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेबद्दल विचारले.

आम्ही बाळासाहेबांचे विचार विसरलो, त्यामुळे आम्हाला त्यांची जयंती साजरी करण्याचा अधिकार नाही, असं म्हणणाऱ्याच्या थोबाडीत मारले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. शिरसाट म्हणाले, बाळासाहेब हे राज्याचे नाही, तर देशाचे होते. या राज्यात आणि देशात त्यांनी हिंदूंना स्वाभीमानाने जगायला शिकवले. तरुणांच्या हाताला काम मिळवून दिले.

Mla Sanjay Shirsat News, Aurangabad
Latur Collector Office : अबब...कारकुनाने लुटले तब्बल २३ कोटी; बनावट सह्यांद्वारे सरकारी योजनांचे पैसे वळविले भावाच्या खात्यावर

त्यामुळे बाळासाहेबांची जयंती ही प्रत्येकांनी साजरी केली पाहिजे. ते महाराष्ट्राचे नाही तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी लाखो शिवसैनिक घडवले, त्यांनी आम्हाला राजकारणात मोठं केल. सर्वसामान्यांच्या मनात उर्जा निर्माण करणारा हा नेता आहे. अनेकांना त्यांनी पोटापाण्याला लावले, स्वाभीमानाने जगायला शिकवले, असेही शिरसाट म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com