Kundlik Khande  Sarkarnama
मराठवाडा

Kundlik Khande News : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला जामीन मिळाला, मात्र घरी जाता येणार नाही !

Political News : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी काही दिवसापूर्वी एकावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणांत दोन महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे.

Dattatrya Deshmukh

Beed News : शिवसेना शाखाप्रमुख ते जिल्हा प्रमुख. विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही पक्षांत या पदावर संधी मिळाली. गेल्या 15 वर्षांपासून ग्रामपंचायतीवर सत्ता, पत्नी पंचायत समिती सदस्य असा राजकीय दबदबा असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कुंडलिक खांडे यांना स्वतःच्याच गावात जाता येणार नाही. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका प्रकरणात कुंडलिक खांडे यांना जामीन देताना ही अट घातली आहे.

उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील संशयित शिवसेना (Shivsena) माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khande) यांना दोन महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. मात्र, प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत त्यांना स्वतःच्या म्हाळसजवला गावी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. (Kundlik Khande News)

या हल्ला प्रकरणात तब्बल दोन महिन्यांपासून कुंडलीक खांडे कोठडीत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खांडे यांना जामीन मंजूर केला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर बीडजवळ प्राणघातक हल्ला झाला होता.

एप्रिल महिन्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात 12 संशयितांवर गुन्हा नोंद झाला होता. यात, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांना दोन महिन्यापुर्वी अटक झाली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणातील युक्तीवाद 22 तारखेलाच पूर्ण झाला होता.

गेल्या काही दिवसापासून न्यायालयाने हे प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवले होते. यावर बुधवारी न्यायालयाने निर्णय देत कुंडलिक खांडे यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी सुरु होईपर्यंत त्यांना त्यांच्या गावात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT