Jayashree Bornare- Ramesh Bornare Sarkarnama
मराठवाडा

शिवसेना आमदाराची भावजयीला बेदम मारहाण; 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

Crime news marathi| Shivsena| सटाणा या ठिकाणी गुरुवारी भाजपच्या शाखेचं उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जयश्री बोरनारे याही पतीसह उपस्थित होत्या.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेना आमदाराने कुटुंबियांसोबत मिळून भावजयीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातून उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवसेना (Shivsena) आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य नऊ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. एका आमदारानेच आपल्या भावजयीला अशा प्रकारे बेदन मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सटाणा या ठिकाणी गुरुवारी भाजपच्या शाखेचं उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे याही पतीसह उपस्थित होत्या. त्यावेळी जयश्री बोरनारे यांनी डॉ. कराड व माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांचा सत्कार केला.

मात्र हा सत्कार बोरनारे कुटुंबीयांच्या सहन झाला नाही. त्याचा राग मनात धरून आमदार बोरनारे यांच्या कुटुंबीयांनी जयश्री यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या. इतकेच नव्हे तर बोरनारे कुटुंबियांनी जयश्री यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याचीही धमकी दिली. आमदार बोरनारे स्वतः या मारहाण केल्याचे जयश्री यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

जयश्री बोरनारे पतीसोबत गोदावरी कॉलनीत एका नातेवाईकांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमात गेल्या होत्या. या भर कार्यक्रमातच बोरनारे कुटुंबियांनी जयश्री आणि त्यांच्या पतीलाही जबर मारहाण केली. त्यानंतर दोघांनीही पोलीस ठाणे गाठले बोरनारे कुटुंबियांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आमदार रमेश बोरनारे, त्यांचा भाऊ संजय बोरनारे, दीपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य बोरनारे, रणजीत चव्हाण, संपत बोरनारे, अबोली बोरनारे, वर्षा बोरनारे, संगिता बोरनारे व दिनेश बोरनारे या दहा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT