Saeed Khan Vs Rajesh Vitekar sarkarnama
मराठवाडा

Parbhani Politics: 'मित्राची गद्दारी अन् शत्रूची साथ!' शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली; आमदार सईद खान यांचा थेट राजेश विटेकरांवर बॉम्ब!

Saeed Khan Vs Rajesh Vitekar : विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार राजेश विटेकरांनी आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आमदार सईद खान यांनी केला आहे.

Jagdish Pansare

Parbhnai Politics : राज्यात महायुतीची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर मित्र पक्षांमध्ये मोठे वाद आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान हे विजयी झाले. परंतु दोन्ही जिल्ह्यात महायुतीची मोठी ताकद, संख्याबळ असताना खान यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केला, असा जाहीर आरोप खान करताना दिसत आहेत. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो की पाथरी नगरपालिकेची निवडणूक, संधी मिळेल तिथे विटेकर यांनी सईद खान यांच्या वाटेत काटे पेरण्याचे काम केले. अर्थात सईद खान यांनी पाथरी नगरपालिका, परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आणि जिल्हा बँकेतही बाजी मारली.

सईद खान हे स्वतः विधान परिषदेवर आमदार, जिल्हा बँकेत संचालक आहेत. तर एक भाऊ त्यांचा पाथरी नगरपालिकेचा नगराध्यक्ष तर दुसरा जिल्हा बँकेत संचालक आहे. परंतु महायुती असताना आमदार राजेश विटेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांच्याशी हातमिळवणी करून आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केला याची सल खान यांच्या मनात कायम आहे.

एका स्थानिक जाहीर कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील खदखद भाषणातून व्यक्त केली. निवडून आल्यानंतरही राजेश विटेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी वाद घालत मला विरोध केला, दादागिरी केली, असा आरोप खान यांनी केला. राजेश विटेकर, राहुल पाटील या दोन आमदारांनी जिल्ह्यात कायम सोयऱ्याधायऱ्याचे काम केले.

दुर्राणींची दादागिरी मोडून काढली..

हे दोघे वेगवेगळ्या पक्षात असले तरी मुंबईत एकत्र असतात. एकाच खोलीत राहतात, एकत्र जेवतात, पण येणाऱ्या काळात आपण त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सईद खान यांनी दिला. माझ्यावर दादागिरीचा प्रयत्न करू नका, काँग्रेसचे माजी आमदार बाबाजणी दुर्राणी यांची पाथरीतील दादागिरी मोडून काढत मी नगरपालिका आणली आहे, तेव्हा आम्हाला कोणी दादागिरी शिकवू नये, असा इशारा सईद खान यांनी दिला.

संजय जाधवांची भूमिका महत्त्वाची

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अठरापगड जातीला सोबत घेऊन चालण्याच्या शिकवणीनूसार माझ्या सारख्या अल्पसंख्याक तरुणाला विधान परिषदेची उमेदवारी दिली. खासदार संजय जाधव यांनी मला निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली.

आता २०२९ मध्ये त्यांना निवडून आणण्यासाठी आपण जीवाचे रान करू. आमदाराचे काय करायचे ते ते ठरवतील? आनंद भरोसे यांनी आता जरा माल बाहेर काढावा, असा टोलाही सईद खान यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT