Saeed Khan Babajani Durrani : सईद खान-बाबाजानी दुर्राणी यांच्या राजकीय संघर्षात पाथरीकरांचे हाल!

Pathri residents affected by political conflict: सर्वसाधारण सभेत बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून गोंधळाची शक्यता लक्षात घेता नगराध्यक्ष आरिफ खान यांनी काही मिनिटातच सभा गुंडाळली. तर मुख्याधिकाऱ्यांनी प्रकृतीचे कारण देत सत्ताधाऱ्यांना साथ दिली, असा आरोप करत बाबाजानी दुर्राणी यांनी सभागृहात ठिया दिला.
Saeed Khan Babajani Durrani Pathri Hit by Political Rivalry
Saeed Khan Babajani Durrani Pathri Hit by Political RivalrySarkarnama
Published on
Updated on

Pathri Municipal Council: शिवसेनेचे आमदार सईद खान आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. पाथरी नगरपरिषदेवर 35 वर्ष अधिराज्य गाजवलेल्या दुर्राणी यांच्या साम्राज्याला आमदार सईद खान यांनी हादरा दिला. नगराध्यक्षपदासह पाथरीची सत्ता हाती आल्यापासून सभागृहात आणि सभागृहाबाहेर दुर्राणी विरुद्ध खान असा राजकीय संघर्ष सातत्याने सुरू आहे.

पाथरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये नगराध्यक्ष आरिफ खान, स्वीकृत सदस्य बाबाजानी दुर्राणी तसेच त्यांचे नगरसेवक पुत्र जुनेद खान यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत बाबाजानी दुर्राणी यांनी केंद्र सरकारकडून शहराच्या दिवाबत्तीसाठी तसेच स्वच्छतेसाठी आलेला आठ कोटी चौदा लाखांचा निधी गेला कुठे?

असा प्रश्न उपस्थित करत नगराध्यक्ष तथा सत्ताधारी शिवसेनेसह मुख्याधिकारी यांच्यावर केंद्र सरकारकडून आलेला निधी गिळंकृत केल्याचा आरोप केला. सर्वसाधारण सभेत बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून गोंधळाची शक्यता लक्षात घेता नगराध्यक्ष आरिफ खान यांनी काही मिनिटातच सभा गुंडाळली. तर मुख्याधिकाऱ्यांनी प्रकृतीचे कारण देत सत्ताधाऱ्यांना साथ दिली, असा आरोप करत बाबाजानी दुर्राणी यांनी सभागृहात ठिया दिला.

Saeed Khan Babajani Durrani Pathri Hit by Political Rivalry
Maharashtra News Live Update : महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पुण्यात 45 जणांना घेतले चौकशीसाठी ताब्यात

नगराध्यक्ष आरिफ खान यांनी पळ काढला त्यांना सभागृहात परत बोलवा, मुख्याधिकाऱ्यांना परत बोलवा, अशी मागणी करत बाबाजानी दुर्राणी यांनी आक्रमक पवित्र घेतला. पोलिसांनी त्यांना सभागृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न करतात ते अजूनच भडकले. आम्ही आतंकवादी आहोत का? नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पोलिसांचे काय काम? असे म्हणत त्यांनी नगराध्यक्षांवर तोफ डागली.

Saeed Khan Babajani Durrani Pathri Hit by Political Rivalry
Maharashtra Politics Live Update : मोहोळचे आमदार राजू खरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा

मुख्याधिकारी हे भ्रष्टाचारी असून सत्ताधारी नगराध्यक्षांच्या हाताचे बाहुले बनले आहेत. केंद्र सरकारकडून पाथरी शहराच्या दिवाबत्ती, स्वच्छतेसाठी आलेले आठ कोटी 14 लाख रुपये निधी सत्ताधाऱ्यांनी खाऊन टाकला.

शहरात स्वच्छता नाही, नळाला पाणी येत नाही याला जबाबदार कोण? यावर सभागृहात चर्चा करण्याऐवजी नगराध्यक्ष तोंड लपवून पळून गेले, या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. आठ कोटी 14 लाखांचा हिशोब द्या, अशी मागणी करत बाबाजानी दुर्राणी चांगलेच आक्रमक झाले होते.

Saeed Khan Babajani Durrani Pathri Hit by Political Rivalry
Parbhani MLC : विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानात झळकली राष्ट्रवादीच नाराजी : शिवसेनेच्या उमेदवाराची विजयासाठी दमछाक

तुम्हाला नगरसेवकही राहू देणार नाही..

पाथरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुंडाळल्याचा आरोप करणाऱ्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना नगराध्यक्ष आरिफ खान यांनी प्रत्युत्तर दिले. नगरपरिषदेची सत्ता गेल्यापासून बाबाजानी दुर्राणी हे पिसाळले आहेत.

सत्ता बदलल्यानंतर पाथरी शहराचा होत असलेला विकास त्यांना पाहावत नाही. शहरात स्वच्छतेची कामे दररोज सुरू आहेत, दर चार दिवसाला नळाला पाणी येते, याशिवाय विविध विकासकामेही सुरूच आहेत.

Saeed Khan Babajani Durrani Pathri Hit by Political Rivalry
Maharashtra Politics Live Update : रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये उद्या बंद

मात्र, केवळ सर्वसाधारण सभेला यायचे आणि गोंधळ घालायचा एवढाच उद्योग बाबाजानी दुर्राणी यांना उरला आहे. या गोंधळामुळे त्यांना यापूर्वी आम्ही कामकाजातून निलंबित केले होते, मात्र तरीही त्यांच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही.

विषय पत्रिकेनुसार सभागृहाचे कामकाज चालते, मात्र त्यांना नको त्या विषयावर बोलुन गोंधळ घालायचा होता. त्यांनी केंद्र सरकारकडून आलेल्या निधीचा हिशेब मागितला आहे तो आम्ही त्यांना कधीही द्यायला तयार आहोत.

Saeed Khan Babajani Durrani Pathri Hit by Political Rivalry
Vidarbha Politics : काँग्रेसचा गड ढासळला! विदर्भातील बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; 600 कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार!

बाबाजानी दुर्राणी यांची भ्रष्ट राजवट आम्ही घालवल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पस्तीस वर्षे त्यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार केला. नगरपरिषदेच्या जागेवर बाबा टावर, हमिदा टावर उभे केले. या सगळ्या भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही गोळा केले आहेत, लवकरच त्यांच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ येणार आहे.

त्यांना भविष्यात आम्ही स्वीकृत सदस्य म्हणूनही राहू देणार नाही असा, इशारा नगराध्यक्ष आरिफ खान यांनी दिला. एकूणच पाथरी तालुक्याच्या राजकारणात दुर्राणी विरुद्ध खान संघर्ष टोकाला पोहोचला असून यात पाथरीची सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात असल्याचा सूर निघू लागला आहे.

Saeed Khan Babajani Durrani Pathri Hit by Political Rivalry
Parbhani MLC : विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानात झळकली राष्ट्रवादीच नाराजी : शिवसेनेच्या उमेदवाराची विजयासाठी दमछाक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com