Santosh Bangar On Manikrao kokate (2).jpg Sarkarnama
मराठवाडा

Santosh Bangar: एकाकी पडलेल्या कोकाटेंसाठी शिंदेंचा पठ्ठ्या धावला,संतोष बांगरांचा मोठा दावा; म्हणाले,'त्या' व्हिडिओशी छेडछाड...

Santosh Bangar On Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी इजा बिजा आणि तिजाचा उल्लेख करत थेट वादात सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंसोबत सोमवारी किंवा मंगळवारी बोलणार असल्याचं सांगत मोठ्या निर्णयाचे संकेत दिले होते.

Deepak Kulkarni

Hingoli News : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. पण एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीत एकट्या पडलेल्या मंत्री कोकाटेंच्या मदतीला थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार धावून आला आहे.

हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी शुक्रवारी (ता.25) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकाटेंच्या सभागृहातील रम्मी खेळतानाचे जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडिओवरच शंका घेतली आहे.

आमदार संतोष बांगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्याची शक्यता असून त्यांच्या राजीनाम्याच्या सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. कोकाटे हे सर्वात चांगले मंत्री आहे. माणिकराव कोकाटे रमी खेळत नव्हते, त्यांचा व्हिडिओ क्रॉप केलेला आहे. अलिकडच्या काळात कुणीही काहीही क्रॉप करुन बनवत असल्याचंही धक्कादायक विधानही बांगर यांनी यावेळी केलं आहे.

माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी रमी वगैरे काही खेळलेली नाही, तो व्हिडिओ क्रॉप केलेला असल्याचं विधान करत आमदार बांगर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. ते म्हणाले, सध्या क्रॉप करून काहीही करत आहेत. तुम्हाला संतोष बांगरचं मुंडकं (तोंड) लावत आहेत, मला तुमचं मुंडक लावत आहेत, त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. कोकाटे हे सगळ्यात चांगले मंत्री असून त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू असल्याचा दावाही संतोष बांगर यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी इजा बिजा आणि तिजाचा उल्लेख करत थेट वादात सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंसोबत सोमवारी किंवा मंगळवारी बोलणार असल्याचं सांगत मोठ्या निर्णयाचे संकेत दिले होते.

यानंतर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमधून कोकाटेंची पाठराखण करण्यासाठी कोणीही पुढे येत नसताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार बांगर यांनी पुढे येत कृषिमंत्र्यांची बाजू घेतली आहे.

एरवी महायुती सरकारमध्ये निधीवाटपाच्या मुद्द्यांवरुन अजित पवारांवर टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेनेचा आमदार आता थेट कोकाटेंच्या मदतीला धावल्याचं दिसून येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांनाच धक्का बसला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे मला अजून प्रत्यक्ष भेटलेले नाहीत, काल मी दुपारी इथं पोहोचलो. पण काल कोकाटेंनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी म्हटलं की, मी रम्मी खेळतंच नव्हतो. माझी आणि त्यांची भेट झालेली नाही. आता बहुतेक त्यांची आणि माझी सोमवारी भेट होईल असं म्हटलं होतं.

तसेच आम्ही यापूर्वीच सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे की, सर्वांना भान ठेवून बोललं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत. मागे एकदा कोकाटेंकडून एकदा अशीच घटना घडली तेव्हा मी त्याची दखल घेऊन त्यांना सांगून दिलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा परत असंच काहीतरी घडलं होतं, त्यावेळीही मी त्यांना जाणीव करुन दिली होती की इजा झालं, बिजा झालं आता तिजा होऊ देऊ नका असंही अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. पण तिसऱ्यांदा आता याबाबतीत ते म्हणतात की, मी हे करतच नव्हतो. पण चौकशीनंतर ते समोर येईलच.

आता सोमवारी नाहीतर मंगळवारी मी त्यांच्याशी बोलून समोरा-समोर चौकशी करणार आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार. जर यामध्ये तथ्य आढळलं तर तो निर्णय आमच्या अखत्यारित असेल मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेऊ. बाकी या प्रकरणात विरोधक कोण काय बोलतंय? याचं मला काही घेणं देणं नसल्याचंही अजित पवारांनी यावेळी ठणकावलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT