Dashing Tehsildar: 'डॅशिंग' तहसीलदार! वाळूमाफियांना धडा शिकवण्यासाठी घेतली थेट नदीत उडी; 'सिनेस्टाईल'नं पाठलाग अन्...

Jalgaon Tehsildar News : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध ठिकाणी वाळूचोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. तसेच वाळू माफियांनी पोलिसांवर हल्ले करणे, अवैध उत्खनन करणे आणि वाहतूक करणे असे प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहेत.
Jalgaon Tehsildar News
Dhanrangaon Tahsildar Mahesh Suryavanshi.jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. तहसीलदारांचा धाडसी पाठलाग: जळगावमधील धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी जीव धोक्यात घालून नदी पार करत वाळूमाफियांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

  2. वाढती वाळू माफियांची दहशत: राज्यात वाळू तस्करी प्रकरणे वाढली असून, माफिया पोलिसांवर हल्ले करत प्रशासनालाही गृहीत धरत आहेत.

  3. सरकारची कडक भूमिका: अवैध उत्खनन करणाऱ्यांवर आता फक्त दंड नव्हे तर फौजदारी गुन्हे व स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Jalgaon News : गेल्या काही वर्षांत अवैध गौणखनिज वाहतुकीची अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे महसूलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत वाळूमाफियांची मजल पोहोचली आहे. तर दुसरीकडे वाळूमाफिया प्रशासकीय कर्मचारी-अधिकारी यांसह स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी धरून राजरोसपणे वाळूविक्री करत आहेत.पण एका तहसीलदारांनं (Tahsildar) वाळूमाफियांनं धडा शिकवण्यासाठी जबरदस्त डेअरिंग दाखवली.

जळगाव जिल्ह्यातून एक धडाकेबाज कारवाईची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळू तस्करांचा रात्रीसच नव्हे तर दिवसाही खेळ चाले अशी वास्तव परिस्थिती आहे. याठिकाणी वाळूमाफियांनी पोलिस आणि प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता अवैधरित्या वाळू उत्खनन आणि विक्री सुरूच ठेवल्याचं दिसून येत आहे.

वाळू तस्करीच्या वर्चस्वाच्या वादातून याठिकाणी गुन्हेगारांच्या घटनाही वाढताना पाहायला मिळत आहे. पण एका तहसीलदारावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी धाडस दाखवत आणि आपला जीव धोक्यात घालून अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांचा सिनेस्टाईल पाठलाग करत धडा शिकवला.

Jalgaon Tehsildar News
Anjali Damania: हायकोर्टाच्या निकालानंतर 48 तासांतच दमानियांचं मोठं विधान; म्हणाल्या, धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा वापसी...

धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाची बैठक संपल्यानंतर आपल्या ड्युटीच्या ठिकाणी परत येत होते. मात्र,त्यांना बांभोरी पुलाजवळ नदीपात्रामध्ये अवैधरित्या वाळू उपसाचं काम सुरू असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली.

पण तहसीलदार येत असल्याची कुणकुण लागताच संबंधित वाळूमाफियांनी धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. पण त्याक्षणी तहसीलदार महेश सूर्यवंशी यांनी पाण्याचा प्रवाहाचा वेगानं सुरू असताना जीव धोक्यात गालून नदीपात्रात पाण्यात उडी घेतली. सूर्यवंशी यांनी यावेळी नदीचं पात्र पूर्णपणे पोहत पार करत दुसरं टोक गाठलं.

Jalgaon Tehsildar News
Sanjay Raut : मद्य घोटाळ्यात अटक केलेला अमित साळुंके शिंदे पिता-पुत्राचा निकटवर्तीय, संजय राऊतांचा धक्कादायक दावा

तहसीलदारांच्या या धाडसी भूमिकमुळे घटनास्थळावरून वाळूमाफियांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांनी काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. पण वाळूमाफियांना पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, तहसीलदारांच्या या कृतीची प्रशासनासह स्थानिक पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे.

तहसीलदार महेश सूर्यवंशी यांच्या धाडसी कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. नदीत उडी मारून पाठलाग अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये धडकी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला, जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक नागरिकांनी तहसीलदारांच्या धाडसाचं आणि कर्तव्यनिष्ठेचं कौतुक केलं आहे.

Jalgaon Tehsildar News
Honey Trap : खडसे म्हणतात, मला लोढाने महाजनांच्याच 'गुलाबी' गोष्टी सांगितल्या..

गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध ठिकाणी वाळूचोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. तसेच वाळू माफियांनी पोलिसांवर हल्ले करणे, अवैध उत्खनन करणे आणि वाहतूक करणे असे प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहेत. या घटनांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. काही ठिकाणी वाळू माफियांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे कठीण होत असल्याची टीका होताना पाहायला मिळते.

राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाकडून वाळू माफियांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीत आढळलेल्या व्यक्तींवर केवळ दंडात्मक कारवाई नव्हे, तर संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सरकारकडून जारी केले आहेत. तसेच या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

Jalgaon Tehsildar News
Sadabhau Khot On Gulabrao Patil : मंत्री गुलाबरावांची भाजप 'विकेट' घेण्याच्या तयारीत; हर्षलच्या आत्महत्याप्रकरणात सदाभाऊंकडून राजीनाम्याची मागणी
  1. प्रश्न: तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी काय धाडस केलं?
    उत्तर: त्यांनी नदीत उडी मारून वाळूमाफियांचा पाठलाग केला.

  2. प्रश्न: वाळू माफियांकडून प्रशासनाला कोणते धोके निर्माण झाले आहेत?
    उत्तर: माफियांनी पोलिसांवर हल्ले करत गुन्हेगारी कारवाया वाढवल्या आहेत.

  3. प्रश्न: सरकारने वाळू तस्करी रोखण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत?
    उत्तर: अवैध उत्खनन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे आणि प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत.

  4. प्रश्न: महाराष्ट्रातील महसूल विभागाने यासाठी कोणती बैठक घेतली?
    उत्तर: पुण्यात महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कठोर उपाययोजना ठरवण्यात आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com