Marathwda Politics : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहा खासदारांनी बंडखोरी प्रवेश केला. यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. यानंतर शिंदेनी बंडखोर खासदारांसाठी निधीचा पेटारा उघडला.
शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे बंडखोर खासदारांना काही निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. यानंतर आता मराठवाड्यातील धाराशिवमध्ये पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. येथे पुन्हा एकदा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यात वाद सुरू झाल्याचे दिसत आहे. तर आलेल्या निधीवरून श्रेय वादाची लढाई देखील सुरू झाली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिंदे यांच्यासमोर बंडखोर खासदारांनी मतदारसंघाचा विकास आणि विकासनिधी या कारणामुळेच आम्ही पक्षांतर करत आहोत, असे म्हटले. पण नुकताच याबाबत महिती समोर आली असून कोट्यावधींचा निधी असतानाही काही लाखातच विकास निधी या खासदारांनी खर्च केल्याचे उघड झाले आहे. यावरून सध्या या खासदारांवर टीकेची झोड उठली आहे.
अशातच शिंदे यांनी निधीचा पेटारा उघडून पक्षात आलेल्या खासदारांना काही निधी तत्काळ देण्याच्या सूचना दिल्या. शिंदेंकडून राजेनिंबाळकर यांना मोठा निधी धाराशिवमधील विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. यावरूनच आता वाद सुरू झाला आहे. 18 कोटीचा निधी एकनाथ शिंदे मार्फत मिळाल्याची ओम राजेनिंबाळकरांनी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांनी धाराशिव शहराच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय! उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झाल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांच्या आदेशानंतर धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या विकास कामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. धाराशिवच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ देणारे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार असे म्हटले आहे. तर धाराशिवच्या विकासाचा हा प्रवास असाच वेगाने सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.
यावर शहरातील विविध विकास कामाला सरकारकडून निधी मिळाल्याची राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडूनही फेसबुक पोस्ट करत याला पलटवार करण्यात आला आहे. तर आपण केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे राणाजगजीतसिंह पाटलांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. यामुळे आता धाराशिवमध्ये आता पुन्हा एकदा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात वाद सुरू झाला असून आता श्रेय वादाची लढाई सुरू झाली आहे.
राणाजगजीतसिंह पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत धाराशिव नगर परिषदेला तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातील मंजुरी आदेश आज राज्य शासनाने निर्गमित केले आहेत. या निधीतून धाराशिव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.
तर धाराशिवच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, शहराच्या प्रगतीला नवी गती देणारा हा निधी भविष्यातील विकासाचा मजबूत पाया ठरणार आहे. धाराशिव शहराच्या विकासासाठी उदारपणे निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन! असे म्हटलं आहे.
नेमंक काय म्हणाले होते शिंदे
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी निधीचा पेटारा उघडताना जे खासदार पक्षात आलेले आहेत, त्यांना भरघोस विकासनिधी दिला जाईल. आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही. हे ऑपरेशन टायगर देखील यशस्वी झालं असून सगळ्या कायदेशीर, घटनात्मक प्रकिया पूर्ण झालेल्या आहेत. यामुळे सगळेच सहा खासदार आनंदी आहेत.
आता आलेल्या खासदारांच्या विभागात वेगाने विकास होणार असून निधीचे प्रस्ताव आणायला सांगितले आहेत. पण आजच काही विभागांचा निधी त्यांना तत्काळ देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आमचा आणि आलेल्या खासदारांचा अजेंडा हा मतदारसंघांचा विकास हाच आहे. आतातर एनडीएचीही ताकद वाढली असल्याने बंडखोरी केलेल्या खासदारांना विकासनिधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असेही शिंदे म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.