Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News, Aurangabad
Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : भाजपच्या ऑफरवर खैरे म्हणाले, कराडांना पॉलिटिकल मॅच्युरिटी नाही..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : मकरसंक्रांती निमित्त भाजपचे खासदार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना तिळगुळ दिला. तो देत असतांनाच भाजपमध्ये येण्याची ऑफरही दिली. या ऑफरची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु याबद्दल विचारले तेव्हा, खैरेंनी कराडांच्या राजकीय बुद्धीवरच प्रश्न उपस्थितीत केला.

`मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, (Bjp)भाजपमध्ये कशाला जावू. कराडांना पॉलिटिकल मॅच्युरिटीच नाही`, असा टोला लगावला. भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना खैरे यांनी (Shivsena) शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. यावरून त्यांच्यावर बरीच टीकेची झोड भाजपकडून उठवण्यात आली होती.

त्यानंतर कराडांनीच तिळगुळ देतांना खैरेंना भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले होते. याविषची छेडले असता, खैरे म्हणाले, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच नाही. कराडांना जर पॉलिटिकल मॅच्युरिटी असती, तर त्यांनी असा प्रश्नच केला नसता. मुळात कराड हे नशीबाने झालेले खासदार आहेत.

त्यांना नगरसेवक, महापौर मी केले होते, ते काय मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देतात. त्यांना अजून राजकारण कळालेच नाही, नशीबाने खासदार झाले, खासदारकी कळण्याआधीच त्यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले. पण त्यांना अधिकार किती आहेत? मी वीस वर्ष खासदार होतो, राज्यमंत्र्यांना किती अधिकार असतात हे मला चांगले माहित आहे.

त्यामुळे त्यांनी नको त्या भानगडीत पडू नये, असा सल्ला देखील खैरेंनी दिला. इम्तियाज जलील हे दोघांच्या भांडणात पुन्हा मीच खासदार होणार असा दावा करत आहेत, याकडे लक्ष वेधले असता, एकदा चूक झाली, पण आता मुस्लिम लोकच त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे पुन्हा खासदार होण्याचे त्यांचे स्वप्न कधीच पुर्ण होणार नाही, असेही खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT