औरंगाबाद : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला आणि राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप झाला. चिन्ह गोठवण्याचा निर्णय (Shivsena) शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. पण अशा संकटात देखील शिवसैनिक जिद्द दाखवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अंधेरी ईस्टच्या पोटनिवडणूकीत हीच जिद्द आणि पेटलेला शिवसैनिक पक्षाला विजय मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून भाजपने शिवसेनेतीलच गद्दारांच्या मदतीने शिवसेना संपवण्याचा विडा उचलल्याचा आरोप ठाकरेंकडून केला जातोय. (Uddhav Thackeray) धनुष्यबाण चिन्ह गोठवणे आणि शिवसेना हे नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव करणे हा त्याचात भाग असल्याचे आता बोलले जात आहे. (Aurangabad) यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Opposition Leader Ambadas Danve यांनी एक सूचक ट्विट केले आहे.
`आमचे चिन्ह गोठले असेल, पण रक्त नाही`, असे म्हणत त्यांनी ठाकरे नावावर आम्ही पुन्हा जिंकू असा दावा केला आहे. दानवे यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केले आहे. दानवे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आता कदाचित न पक्षाचे नाव असेल न चिन्ह! सोबत आहे फक्त 'ठाकरे' नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म.. कायदेशीर लढाया सुरूच राहतील.. मात्र आमच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने कितीही आपटली तरी 'ठाकरे' नावाचे वलय काढून घेण्यास त्यांना अजून अनेक जन्म घ्यावे लागतील.
एकंदरित शिवसैनिकांमध्ये चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे संतापाचे वातावरण आहे. सोशल मिडियावर या निर्णयाच्या विरोधात शिवसैनिक आपल्या संतापाला वाट करून देतांना दिसत आहेत. आता शिवसेना कोणत्या चिन्हावर अंधेरीची निवडणूक लढणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.