Pawar : चिन्ह गेल्याने काही फरक पडत नाही, मी पाच चिन्ह घेऊन निवडणुका लढलो..

सर्वप्रथम मी निवडणूक लढलो तेव्हा माझे चिन्ह बैलजोडी हे होते, त्यानंतर गाय-वासरू चिन्हावर मी निवडणूक लढलो होतो. पुढे चरखा, पंजा आणि घड्याळ हे चिन्ह घेऊन मी निवडणुक लढलो आणि जिंकलो देखील. (Sharad Pawar)
Ncp President Sharad Pawar News, Aurangabad
Ncp President Sharad Pawar News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला जोरदार दणका दिला. शिवसेना व धनुष्यबाण हे दोन्ही तात्पुरते वापरण्यास त्यांना मज्जाव केला आहे. शिंदे गटाला देखील हाच नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे (Shivsena) शिवसेना हवालदिल झाली आहे, मात्र चिन्ह नसल्याचे काही फरक पडत नसतो, मी स्वतः पाच चिन्हावर निवडणूक लढलो आहे, असा दिलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेला देण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबादेत (Aurangabad) शरद पवारांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याच्या प्रश्नावर प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. मला हा निर्णय अपेक्षित होता, त्यामुळे आपल्याला याचे आश्चर्य वाटले नाही असे म्हणत पवारांनी केंद्राकडे बोट दाखवले. शरद पवार म्हणाले, शिवसेनेचे निवडणुक चिन्ह गोठवून त्यांना शिवसेना हे नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने तात्पुरती परवानगी नाकारली आहे.

परंतु निवडणूक चिन्ह गोठवले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. त्याने फारसा फरक पडत नसतो. मी स्वतः यातून गेलो आहे. सर्वप्रथम मी निवडणूक लढलो तेव्हा माझे चिन्ह बैलजोडी हे होते, त्यानंतर गाय-वासरू चिन्हावर मी निवडणूक लढलो होतो.

Ncp President Sharad Pawar News, Aurangabad
मोदींनी सगळ्या यंत्रणा हातात ठेवल्यात, फडणवीसांनी रचलाय डाव : खैरेंचा आरोप!

पुढे चरखा, पंजा आणि घड्याळ हे चिन्ह घेऊन मी निवडणुक लढलो आणि जिंकलो देखील. त्यामुळे चिन्ह गेल्यामुळे शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही. अशा प्रकारांनी शिवसेना संपेल असे जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. शिवसेना आणखी जोमाने वाढेल, असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com