Shivsena Political News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Political News : खैरेंच्या वाढदिवसाला गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट गर्दी; काय आहे कारण ?

Chandrakant Khaire News : सलग चार वेळा चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

Jagdish Pansare

Marathwada Political News : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना काल (ता. 1) वाढदिवस साजरा झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खैरेंचा हा पाचवा वाढदिवस. पण गेल्या चार वर्षांच्या तुलनेत काल खैरे यांना शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या दुप्पट होती. (Shivsena News) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. काल वाढदिवसानिमित्त खैरे यांना शुभेच्छा देण्यासाठी झालेली गर्दी पाहता त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केला आहे, त्यात छत्रपती संभाजीनगरच्या जागेचाही समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ही जागा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) अवघ्या 4492 मतांनी हरले होते. छत्रपती संभाजीनगर हा गेल्या 25-30 वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

1957 ते 77 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसची पकड होती. त्यानंतर जनता दलाचे बापूसाहेब काळदाते या मतदारसंघातून विजयी झाले होते. (Marathwada) पुढच्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या काझी सलीम आणि त्यानंतर काँग्रेस (एस) कडून साहेबराव पाटील हे लोकसभेवर निवडून गेले होते. 1991 मध्ये सर्वप्रथम शिवसेनेने संभाजीनगरची लोकसभा लढवली आणि मोरेश्वर सावे मशाल या चिन्हावर निवडून आले. तेव्हापासून 1998 मधील काँग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील यांचा अपवाद वगळता 2014 पर्यंत ही जागा शिवसेनेने राखली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पैकी चार वेळा सलग चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2019 च्या निवडणुकीत खैरे यांचा एमआयएमकडून धक्कादायक पराभव झाला. खैरे आता संपले, त्यांच्याविरोधात लाट होती, वीस वर्षांत त्यांनी काहीच विकासकामे केली नाही, अशी चर्चा त्यांच्या पराभवानंतर होऊ लागली. मातोश्रीवरही त्यांचे वजन कमी झाले, जिल्ह्यातील पक्षांतर्गत विरोधकांनीही उचल खाल्ली.

पण अशा पडत्या काळातही खैरे यांनी 'श्रद्धा आणि सबुरी' बाळगली. शिवसेना फुटली तरी पक्ष सोडला नाही, त्यामुळेच 2024 साठी ठाकरे यांची पहिली पसंती ही खैरे यांनाच असल्याचे बोलले जाते. खैरे यांची वाढती सक्रियता, समर्थकांचे त्यांच्याभोवती वाढलेले जाळे पाहता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दावेदारीनंतरही एकनिष्ठ शिवसैनिकांची पहिली पसंती खैरेंनाच असल्याचे दिसते. वाढदिवसानिमित्त खैरे यांना शुभेच्छा देण्यासाठी झालेली दुप्पट गर्दी पाहता खैरेंना उमेदवार निश्चित मानली जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT