March Against Inflation In Aurangabad News Sarkarnama
मराठवाडा

शिरसाटांच्या आरोपाला शिवसेनेकडून पुराव्यासह प्रत्युत्तर.. राऊतांचा मोर्चातील फोटोच दिला..

वाढलेल्या महागाईच्या विरोधात काही महिन्यांपुर्वी औरंगाबादेत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व संजय राऊत यांनी केले होते. ( Shivsena, Aurangabad)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : ज्यांनी कधी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेतला नाही, कधी मोठ्या मोर्चात, आंदोलनात सहभाग नव्हता असे संजय राऊत (Sanjay Raut) रोज उठून पत्रकार परिषद घेतात आणि आमच्यावर टीका करतात, असा आरोप आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला होता. त्याला शिवसेनेकडून संजय राऊत यांचा औरंगाबादेतील महागाई विरोधातील मोर्चातला फोटो व्हायरल करत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी हा फोटो ट्विट करत संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. (Shivsena) बंडखोरी केली की असे खुलासे करावे लागतात, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली होती. यावर संजय राऊत यांच्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली.

ज्यांनी कधी हातात भगवा धरला नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन केले नाही, साधा ढेकून देखील मारला नाही, ते राऊत आम्हाला शिकवतायेत, अशा शब्दात शिरसाट यांनी राऊतांवर हल्लाबोल केला होता. त्याला तासाभरातच शिवसेनेकडून उत्तर देण्यात आले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेल्या महागाईच्या विरोधात काही महिन्यांपुर्वी औरंगाबादेत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चाचे नेतृत्व संजय राऊत यांनी केले होते. या मोर्चाचा समारोप गुलमंडी येथे होऊन तिथे राऊत यांनी छोटेखानी सभा देखील घेतली होती. या मोर्चात राऊत यांनी हातात भगवा झेंडा घेऊन क्रांतीचौक ते गुलमंडीपर्यंत पायी सहभाग नोंदवला होता. त्याचाच हवाला आणि फोटो, व्हिडिओ ट्विट करत दानवे यांनी शिरसाट यांना सुनावले. तुमच्याच गल्लीतला हा घ्या, पुरावा असे म्हणत दानवेंनी शिरसाट यांच्या आरोपातील हवा काढून टाकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT