Raj Thackeray, Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : माझ्या नादाला लागू नका, म्हणणाऱ्या राज ठाकरेंना ठाकरे गटाचं सडेतोड प्रत्युत्तर

Ambadas Danve Attack on MNS : मनोज जरांगेच्या आडून शिवसेना राजकारण करते, हे राज ठाकरेंनी सिद्ध करून दावखवावे. असले धंदे शिवसेना तर कधीच करणार नाही.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मनसे प्रमुख राज ठाकरे राज्याभर नवनिर्माण यात्रेद्वारे आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. यादरम्यान, त्यांनी सोलापूरात राज्यात आरक्षणाची काही गरज नसल्याचे विधान केले. त्यावरून आक्रमक झालेल्या मराठा कार्यकर्त्यांनी ठाकरेंना धारशीव येथे जाब विचारला. तर बीडमध्ये त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या.

या प्रकाराने चिडलेल्या राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार Sharad Pawar यांना माझ्या नादाला लागू नका, असा इशारा दिला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे. हे मोहोळ फक्त सुपाऱ्या वाजवण्यासाठी असल्याचा पलटवार दानवेंनी केला आहे.

बीडमधील ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर राज ठाकरे Raj Thackeray यांनी शनिवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करतात, असा आरोप केला. ते माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

तुम्हाला आताच सांगतो, माझ्या वाटेला जाऊ नका. असले प्रकार घडले तर तुम्हाला सभाही घेता येणार नाहीत. माझी पोर काय करतील हे सांगता येणार नाही, अशा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठकारेंच्या इशाऱ्याला अंबादास दानवे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

अंबादास दानवे Ambadas Danve म्हणाले, आम्हाला मनोज जरांगे यांच्या आडून राजकारण करण्याची काहीही गरज नाही. उलट तुम्हीच भाजप आणि आमच्यातून गेलेल्या शिंदे गटाच्या आडून राजकारण करता का? ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी असतात हे विसरू नये. तुमचे हे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठीच आहे. हे मोहोळ सुपाऱ्या वाजवण्यासाठी असते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असल्याचा हल्लाबोलही दानवे यांनी राज ठाकरेंवर केला आहे.

कुणाच्याही आडून शिवसेनेला राजकारण करण्याची गरज नाही असेही दानवेंनी स्पष्ट केले. तुम्ही म्हणाला, की शिवसेना आंदोलक मनोज जरांगेच्या आडून राजकारण करते. आता हे राज ठाकरेंनी सिद्ध करून दावखवावे. असले धंदे शिवसेना तर कधीच करणार नाही. त्यांना अजित पवारांनी Ajit Pawar जातीचे राजकारण केले नाही, असा साक्षात्कार आत्ता झालेला आहे. आता तुमच्या यापूर्वीच्या भूमिका लक्षात घेतल्या तर आपल्याला स्पष्टीकरण मिळेल, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT