Amitesh Kumar : पुण्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता; पुणे पोलिस आयुक्तांची नामांकित हॉटेलला नोटीस

Pune Police : हे हॉटेल उशिरापर्यंत सुरू असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
Amitesh Kumar
Amitesh KumarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ड्रग्ज, हिट अॅन्ड रन, हॉटेलमधील अवैध कारभार आदी प्रकरणांनी पुणे राज्यासह देशभरात चर्चेले गेले आहे. एकीकडे पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही हॉटेलचालक मात्र त्यांच्या व्यवस्थापनात काहीही बदल करताना दिसत नाहीत.

आता पुण्यात विविध उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे आयुक्तांनी एका हॉटेलला नोटीस बजावली आहे. त्यात दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याचा इशारा देऊन कारभार सुधारण्याचे आवाहन केले आहे.

पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार Amitesh Kumar यांनी, खादी अतिरेकी संघटना गर्दीच्या ठिकाणाला लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणू शकते. त्यात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा दिला आहे.

याबाबत पोलिस आयुक्तांनी शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला हा धोक्याचा इशारा देत तेथील बेकायदा सुरू असणाऱ्या बाबींवरून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कल्याणी नगर परिसरातील या नामांकित हॉटेलला आवाज मर्यादित ठेवण्याबाबत पुणे पोलिसांनी अनेकदा नोटीस बजावलेली आहे. हे हॉटेल उशिरापर्यंत सुरू असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.

या हॉटेल व्यवस्थापनाकडून बहुतांश वेळा डिस्कोथेक परवान्यातील अटी शर्तीचाही भंग केलेला आहे. याबाबत पोलिसांनी हॉटेलवर अनेक कारवाई केल्या आहेत. तरी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडून याकडे कानाडळा केला जात असल्याचा आरोप पोलिसांनी कारणे दाखवा नोटीसमधून केला आहे.

Amitesh Kumar
Shivsena News : ठाण्यात 'बॅनरवॉर' मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात तोफ धडाडण्याआधीच शिंदे गटानं ठाकरेंना ललकारलं

या हॉटेलमध्ये खूप मोठ्या संख्येने गर्दी होते. त्यामुळे येथे चेंगराचेंगरी, आग, गॅस गळती, अफवा यासारखी घटना घडून जीवीतहानी होऊ शकते. तसेच सध्या अतिरेकी कारवायाबाबत अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणू शकते. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता होईल, याकडेही लक्ष वेधले आहे.

अशी भिती असतनाही हॉटेल व्यवस्थापन डिस्कोथेकच्या अटींचे उल्लंघन करते. त्यामुळे आपल्या हॉटेलचा डिस्कोथेक परवाना रद्द का करण्यात येऊ नये, असा सवालही या नोटीसीद्वारे हॉटेल प्रशासनाला विचारले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सहीने ही कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात अली असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Amitesh Kumar
Vijay Wadettiwar : चोर, दरोडेखोर, लुटारुंचे सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी ; वडेट्टीवारांची तोफ धडाडली..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com