Ayodhya Poul -Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Ayodhya Poul News : अयोध्या पौळ यांनी शिंदे गटाला डिवचलं; "...म्हणून 'एकनाथमामा' ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेत असणार !"

Shinde Group Vs Eknath Shinde : " कुठलीही गोष्ट खानदानी माणसाने करावी. घरबसवे..."

Deepak Kulkarni

Nanded News : ठाकरे गट आणि शिंदे गटात दसरा मेळाव्याच्या ठिकाणावरून वाद पेटला होता. दसरा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्क अर्थात 'शिवतीर्थ' घेण्यासाठी दोन्ही गट आग्रही होते. एवढेच नव्हे तर दोन्ही गटांकडून तसे अर्जही दाखल करण्यात आले.

मात्र, अखेर शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेतल्यानंतर मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे ठाकरे गटाचा शिवतीर्थवरील दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचवरून आता ठाकरे गटाच्या महिला नेत्या अयोध्या पौळ(Ayodhya Poul) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.

ठाकरे गटाच्या सोशल मीडिया प्रमुख अयोध्या पौळ यांनी नांदेडमध्ये मीडियाशी संवाद साधला. त्यांनी एकनाथ शिंदेंना(Eknath Shinde) एकनाथमामा म्हणत चिमटाही काढला. त्या म्हणाल्या,उद्धव ठाकरे काय बोलणार? या विचारातून बहुदा लाडक्या एकनाथमामांनी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून येत असल्याचे सांगत शिंदे गटाला डिवचलं आहे.

पौळ म्हणाल्या, शिवतीर्थ आणि ठाकरे हे समीकरण आहे. मी आता मराठावाड्यात आहे, त्यामुळे इथली एक म्हण सांगते. कुठलीही गोष्ट खानदानी माणसाने करावी. घरबसवे जे गावाच्या बाहेर असतात, त्याप्रमाणेच गद्दारांनी दसरा मेळाव्याबाबत बोलूच नये. दसरा मेळाव्याची परंपरा बाळासाहेबांनी सुरू केली. उद्धव ठाकरेंनी ही पुढे सुरू ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

गद्दारांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं, पण त्यांच्याकडे स्वतःचे विचार नाहीत. आमदार आणि खासदारही ते आमचेच घेऊन गेले आहेत. त्यांच्याकडे स्वतःचं काहीच नाही. आहेत ते फक्त अंगावरचे कपडे आहेत. तेदेखील शिवसेनेने त्यांना संधी दिली म्हणून त्यांना परिधान करता येतात, असा टोलाही अयोध्या पौळ यांनी लगावला.(Shivsena Political News)

"आज त्याच राष्ट्रवादीला तुम्ही मांडीवर घेऊन बसला आहात!"

माझ्या लाडक्या एकनाथमामांना मी सांगू शकते, आम्ही राष्ट्रवादीबरोबर बसू शकत नाही असं तुम्ही म्हणाला होतात, आज राष्ट्रवादीला तुम्ही मांडीवर घेऊन बसला आहात. उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार, या विचारांतून बहुदा एकनाथमामांनी आता बी.पी.च्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली असल्याचे म्हणत पौळ यांनी निशाणा साधला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT