Maharashtra politics : राजकारण फिरले ; ज्या फडणवीसांनी सत्तेत आणले त्यांनाच दिल्लीत पाठवण्याची शिंदे गटाला घाई

Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी शिंदे गटाचे आमदार वक्तव्य करत आहेत.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावे, अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सारवासारव करताना शिरसाट यांच्या तोंडाला फेस आला होता. हे कमी की काय म्हणून आता शिंदे गटाचे आणखी एक आमदार संतोष बांगर यांनीदेखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत जावे, असे विधान हिंगोलीत केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यात चांगले काम करत असताना त्यांना दिल्लीतून आदेश आला आणि त्यांना केंद्रात जावे लागले. तसेच आदेश जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून आले तर पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांना तो स्वीकारावा लागेल. फडणवीसांमध्ये दिल्लीत काम करण्याची ताकद आहे, त्यामुळे कदाचित त्यांना दिल्लीला जावे लागेल, असेही बांगर (Santosh Bangar) यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis News
Heramb Kulkarni Attack : काँग्रेसच्या नगर अध्यक्षांचे धाडसच वेगळे; कुलकर्णींवरच्या हल्ल्यानंतर थेट स्टिंग ऑपरेशनच केले

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांना पाहिजे तितके दिवस, वर्षं मुख्यमंत्रिपदावर राहू शकतात. कदाचित पुढील वीस वर्षेही ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला दिसतील, असा विश्वासही बांगर यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आमदार संजय शिरसाट आणि संतोष बांगर या शिंदे गटातील दोन आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला जावे, असा सल्ला किंवा विधान कोणाच्या सांगण्यावरून तर केले नाही ना ? अशी चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Devendra Fadnavis News
PCMC News : अजितदादांचा गड चोहोबाजूंनी घेरला; रोहित पवार, जयंत पाटलानंतर आता सुप्रियाताई मैदानात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com